



🔸तालुकाध्यक्षपदी भाऊसाहेब काळे तर सचिवपदी विष्णू नेहरकर
✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)
आष्टी(दि.2जानेवारी):;प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना जिल्हा शाखा बीड चे जिल्हाध्यक्ष धनंजय कुलकर्णी,विभागीय उपाध्यक्ष पांडुरंग उनवणे,उपाध्यक्ष महादेव गिते,उपाध्यक्षा श्रीमती शीलाताई कातखडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना तालुका शाखा आष्टीची नुकतीच कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.तालुका शाखा आष्टीच्या तालुकाध्यक्षपदी भाऊसाहेब काळे यांची तर सचिवपदी विष्णू नेहरकर यांची एकमताने निवड करण्यात आली असून आष्टी तालुकाध्यक्ष भाऊसाहेब काळे यांनी पुढील प्रमाणे आष्टी तालुका कार्यकारिणी जाहीर केली आहे.
कार्याध्यक्ष – सतीश शिंदे,उपाध्यक्ष – श्रीमती प्रतिभाताई हिंगे,सचिव – विष्णू नेहरकर,कोषाध्यक्ष – भाऊसाहेब गाडे,संघटक – सुनील तळेकर,संघटिका – श्रीमती वैशालीताई झांजे,प्रसिद्धीप्रमुख – शेख शब्बीर,संपर्कप्रमुख – धर्मनाथ साठे,प्रवक्ता – संजय लाड,समन्वयक – बाबासाहेब चव्हाण,सहसचिव – दिलीप दाणी,उपकार्याध्यक्ष – हर्षद शिंदे,उपकोषाध्यक्ष – संतोष वाघुले,सहसंघटक – शहाजी शिंदे,संघटिका – श्रीमती सुवर्णाताई खाडे यांची नियुक्ती आष्टी शाखेच्या कार्यकारिणीत सर्वानुमते करण्यात आलेली आहे.
या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे आष्टी तालुक्यातील शिक्षक नेते अशोक धोंडे,नारायण तरटे,संतोष दाणी आणि प्रहार संघटनेचे जिल्हा पदाधिकारी सर्वश्री कार्याध्यक्ष नवनाथ घोंगडे,ओम प्रकाश आनेराव,सचिव अविनाश काळे,कार्याध्यक्ष सय्यद मुमताज,उर्दू विभागप्रमुख मिर्जा हस्नात,कोषाध्यक्ष उत्तरेश्वर बजगुडे,प्रवक्ता पद्माकर आंधळे,मन्मथ अरबने,श्रीमती निर्मलाताई वाघमारे,उपाध्यक्ष प्रल्हाद फड,शेख ऐनुद्दीन,उपाध्यक्ष श्रीमती वर्षाताई महाजन,समन्वयक शिवाजी झेंडेकर,अण्णासाहेब खंडागळे,सहसंघटक बापू शिंदे,अशोक सप्रे,संघटिका ताराबाई चव्हाण,संपर्कप्रमुख राजाराम लकडे,वसंत तरकसबंद,सहसचिव महेश भट,संजय कुलकर्णी,सहसंघटक सुरेश वाघमारे,संजय लोखंडे,प्रसिद्धीप्रमुख राहुल कांबळे यांनी अभिनंदन करून पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.


