Home महाराष्ट्र अभिनेता प्रसाद सोनवणे यांना महाराष्ट्र राज्य युवा कलागौरव 2021 पुरस्कार

अभिनेता प्रसाद सोनवणे यांना महाराष्ट्र राज्य युवा कलागौरव 2021 पुरस्कार

97

✒️धुळे(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

धुळे(दि.2जानेवारी):- आजवर जे काही काम केलं, त्यास आपण प्रोत्साहन दिलं, कौतुक तुम्ही माय बाप रसिकांनी केले. त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढवला. मी खरच तुम्हा सर्वांचा खूप ऋणी आहे. कला क्षेत्राचा वारसा नसतांना देखील आपण केलेला सगळ्याचा पाठींबा खूप आधार देणारा होता. आज वर अनेक पुरस्कार मिळाले पण artbeats फाऊंडेशन पुणे यांच्याकडून युवा कलागौरव 2021 पुरस्कार घेताना विशेष आनद होतोय. याच वर्षी माझ्या कला क्षेत्राला 8 वर्ष पूर्ण झाली. जेव्हा एखाद्या कालाकाराला पुरस्कार मिळतो तो त्याच्या एकट्याचा कधीच नसतो. त्याच्यामागे अनेकांचे आशीर्वाद, सहकार्य आणि प्रेम असत. माझ्या बाबतीही तसच आहे. माझे वडील,माझी आई, तिघही बहिणी याच्या लाभलेल्या साथीने मी एक कलाकर होऊ शकलो, असे मत प्रसाद सोनवणे यांनी दिले.

मराठी चित्रपट तसेच व्हिडिओ एल्बम वेब सिरिज , मालिका यामधून अभिनय क्षेत्रातील प्रसाद सोनवणे यांनीकमी वयात मोठी झेप घेतली आहे. लहानपणापासून कलाक्षेत्राची आवड असल्यामुळे हळू हळू ती तो जोपासत गेला. प्रसादने कथा, कविता, गाणे असे लेखन क्षेत्रातही आपली छाप उमटवली आहे. artbeats फाऊंडेशन पुणे प्रस्तुत युवा कलागौरव 2021 हा पुरस्कार अभिनेता व दिग्दर्शक म्हणून प्रसाद सोनवणे यांना artbeats संस्थेचे संथापक अध्यक्ष संतोष पांचाल यांनी प्रसाद सोनवणे यांना प्रदान केला.

संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच धुळे जिल्ह्यातून अनेक मान्यवरांनी प्रसाद सोनवणे यांचे कौतुक केलं आहे. धुळे जिल्ह्यासाठी अभिमानास्पद गोष्ट ठरली आहे . महाराष्ट्र राज्य युवा कला गौरव 2021 पुरस्कार मिळाल्यामुळे प्रसादच्या अजून जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here