Home बीड लाच घेताना शेतकरी संघटनेचा जिल्हाध्यक्ष नरवडे व पुरवठा अधिकारी जाळ्यात

लाच घेताना शेतकरी संघटनेचा जिल्हाध्यक्ष नरवडे व पुरवठा अधिकारी जाळ्यात

62

✒️जिल्हा प्रतिनिधी बीड(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.2जानेवारी):-मंडळ अधिकाऱ्याची चौकशी करावी, असा अर्ज देऊन त्यामध्ये पैशाची तडजोड करून ते स्वीकारत असताना शेतकरी संघटनेचा जिल्हाध्यक्ष अशोक नरवडे व त्यांच्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या पुरवठा अधिकारी एस टी कुंभार यांना शुक्रवारी लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने माजलगावात रंगेहाथ पकडले.

येथील तहसील कार्यालयात कार्यरत एका मंडळ अधिकाऱ्याची चौकशी करण्यात यावी अशी तक्रार शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष अशोक नरवडे याने तहसील कार्यालयात दिली होती.याची चौकशी पुरवठा अधिकारी एस टी कुंभार यांच्याकडे होती.या प्रकरणात नरवडे याने पैशाची मागणी केली व त्यात मध्यस्थी कुंभार यांनी केली, शुक्रवारी दुपारी एकच्या दरम्यान कुंभार यांच्या राहत्या घरी एक लाख रुपयांची मागणी केली होती.ती रक्कम घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख भारतकुमार राऊत यांच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या घटनेने खळबळ उडाली आहे.

Previous articleनाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनच्या अभिनव उपक्रमात दिंडोरी जनता इंग्लिश स्कुल ज्यू कॉलेजचा सहभाग
Next articleप्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या उत्कृष्ट कार्याबद्दल समाजरत्न पुरस्कार प्रदान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here