Home Education विद्यानिकेतन मध्ये एकल गीत गायन स्पर्धेचे आयोजन

विद्यानिकेतन मध्ये एकल गीत गायन स्पर्धेचे आयोजन

115

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.2जानेवारी):-विद्यानिकेतन दादावाडी येथे सि.बी.एस.सी.विभागाच्या वतीने नववर्षाच्या निमित्ताने शालेय स्तरावर एकल गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. भजन ,बालगीत, देशभक्तीपर गीत , क्लासिकल गीत, जुन्या लोकप्रिय गीतांचे गायन स्पर्धेचे आयोजन केले गेले होते. इयत्ता १ ते १० वर्गातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग दर्शविला. यावेळी सांस्कृतिक विभागाच्या सौ . सीमा बोहरा यांनी परिश्रम घेतले.

यावेळी कोरोना नियमांचे पालन करुन आयोजन करण्यात आले होते . विद्यानिकेतन शाळेच्या प्राचार्या सपना पिट्टलवार यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम संपन्न झाला. सूत्रसंचालन रजनी बोढेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सुनंदा ठावरी यांनी केले. कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळाले. विद्यानिकेतन शाळेचे अध्यक्ष राज रणजितजी पुगलिया यांनी सहभागी सर्व विद्यार्थींनीचे विशेषत्वाने कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here