



✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)
जिवती(दि.2जानेवारी):-मानीकगड पहाडावरील जिवती तालुका हा अतिदुर्गम डोंगराळ आदिवासी भाग म्हणून महाराष्ट्रत ओळखला जातो हा तालुका मागासलेला विकासापासून कोसो दूर असल्याची जाणीव वारंवार पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते, सुशिक्षित नागरिकांनी वेळोवेळी आप आपल्या पद्धतीने शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधींच्या लक्षात आणून देण्याचे काम केले.याची दखल पण शासन- प्रशासन – लोकप्रतिनिधींनी घेऊन जिवती तालुक्याच्या कायापालट करण्याचा ध्यास घेऊन जिथे गाव तेथे रस्ता, शाळा, अंगणवाडी, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक रुग्णालय, आरोग्य केंद्र, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, गावात घाण होऊ नये म्हणून सांडपाण्यासाठी सिमेंट काॅक्रेट नाल्या आरोग्य चांगले राहावे यासाठी घर-घर शौचालय निर्माण करण्यात आले.सामान्य नागरिक घरा पासून वंचित राहू नये म्हणून घरकुल योजना राबविल्या जात आहेत आणि इतर अनेक विकासाच्या कामावर कोट्यावधी रुपयांची निधी खर्च केली जात आहे.
शासन , प्रशासन व आमदार, खासदार या जिवती तालुक्याच्या विकास करण्यासाठी प्रयत्न करत आहेत मग या विकासाचे कामे चांगले दर्जेदार मजबूत व्हावेत यासाठी आपण लक्ष देण्याची गरज आहे, कारण रस्त्याचे कामे असो की पुलीयाचे व इतर बांधकामासाठी मटेरियल चांगले वापरले जात आहे का, अंदाज पत्रकानुसर काम केले जात आहे का, रस्त्याच्या व पुलियाच्या कामासाठी वापरण्यात येणारे साहित्य मटेरियल इस्टिमेट मध्ये नमूद केलेल्या ठिकाणचे मुरुम,गिट्टी,रेती, सिमेंट,डांबर, लोखंड व इतर साहित्य वापरण्यात येत आहे का? किंवा निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात येत आहे का याची चाचपणी करणे गरजेचे आहे. आता तर तालुक्यात होत असलेले रस्त्याच्या कामासाठी विना परवानगीने स्थानिक पातळीवरील निकृष्ट दर्जाचे मुरुम उत्तखन्न करून अवैधरित्या वापरण्याचा सपाटा संबंधित ठेकेदाराने केला आहे.या ठेकेदारांवर संबंधित महसूल विभाग व वन विभाग मेहरबान असल्याचे दिसून येत आहे.
यामुळे शासन-प्रशासनाचा लाखों रुपयांचा महसूल बुडत आहे.या महसूलीच्या रकमेतून अजून आपल्या तालुक्याच्या विकासासाठी हातभार लावता येते तालुक्याच्या विकासाच्या नावाखाली संबंधित ठेकेदार, महसूल विभाग आणि वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी मालामाल होत आहे.रस्ते,पुलिया व इतर बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत आहे. सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, सुशिक्षित नागरिक, पत्रकार आपण सर्वांनचे कर्तव्य आहे की भ्रष्टाचार, निकृष्ट दर्जाचे कामे, अन्याय, अत्याचाराच्या विरोधात वर्तमानपत्राच्या माध्यमातून, निवेदनाद्वारे, शासन-प्रशासन-लोकप्रतिनीधीनच्या लक्षात आणून दिले पाहिजे तालुक्यात होत असलेले विकास कामे चांगले दर्जेदार होण्यास संबंधित ठेकेदाराला व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांला भाग पाडण्यास प्रयत्न करावे हि आपली सर्वांची जबाबदारी आहे.आपण सर्व मिळून माझा तालुका माझी जबाबदारी घेऊन प्रयत्न करण्याची गरज आहे ती जबाबदारी आपण मिळून पार पाडू





