Home महाराष्ट्र मोहबोडी येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती महोत्सवाचे आयोजन

मोहबोडी येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती महोत्सवाचे आयोजन

305

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

सिंदेवाही(दि.1जानेवारी):-माळी समाज तथा क्रांतीज्योती युवा फाउंडेशन, मोहबोडी द्वारा आयोजित ३ जानेवारी २०२२ रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये सकाळी ७ वाजता ग्राम स्वच्छता अभियान, सकाळी ८ वाजता मुली व महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, त्यानंतर ९ वाजता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची गावातून शोभायात्रा काढून कार्यक्रम स्थळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती चे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मान. सौ. नलिनी ताई चौधरी, सदस्या पंचायत समिती सिंदेवाही आणि मार्गदर्शक म्हणून श्री. नकटूजी सोनुले माजी प्राचार्य, फुले विद्या. सिंदेवाही, प्रा. धनंजय वाढई, माजी प्रा. सर्वोदय क. विद्या. सिंदेवाही, श्री खेमराज डोंगरवार सर ब्रह्मपुरी, आरती खंगार मॅडम मोहबोडी, कु. किनेकार, वनरक्षक मोहबोडी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

कार्यक्रमांमध्ये क्रांतीज्योती युवा फाउंडेशन यांच्या तर्फे दरवर्षीप्रमाणे गाव पातळीवर सामाजिक कार्य करणाऱ्या निवडक व्यक्तींचा समाज गौरव पुरस्काराने व गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात येणार आहे.
दुपारी २ वाजता महिला मेळाव्याचे आयोजन व चर्चासत्र आणि त्यासोबत मुला-मुलींच्या व महिलांच्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी पाच वाजता गाव सहभोजनाचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे. तरी कार्यक्रमाला कोविड १९ चे सर्व नियम हाताळून उपस्थित राहण्याचे आवाहन माळी समाज तथा क्रांतीज्योती युवा फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here