Home महाराष्ट्र महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवणे महत्त्वाचे-आ.गुट्टे

महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवणे महत्त्वाचे-आ.गुट्टे

347

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.1जानेवारी):-महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी बनणे महत्त्वाचे असून यातून आर्थिक उन्नती होईल. हे करण्याकरिता महिलांना विविध व्यवसायांचे प्रशिक्षण देणे गरजेचे असून अशा प्रशिक्षण वर्गाच्या माध्यमातून महिलांना रोजगाराच्या संधी निर्माण होऊन महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम होतील. आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे साहेब व नेहरू युवा केंद्र परभणी (भारत सरकार क्रीडा मंत्रालय) यांच्या संयुक्त विद्यमाने दुर्गा लेडीज टेलर भगवती चौक गंगाखेड येथे २५ ते ३० महिलांना तीन महिन्याचे मोफत टेलरिंग प्रशिक्षण दिले जाणार आसून या प्रशिक्षण वर्गाचे आज उद्घाटन करण्यात आले.

याप्रसंगी आमदार डॉ. रत्नाकररावजी गुट्टे साहेब यांनी प्रशिक्षण वर्गाला दूरध्वनीवरून संबोधित केले त्या प्रसंगी ते बोलत होते.यावेळी युवा नेते उद्धव शिंदे, अंजनाताई कुंडगीर (नगरपरिषद गंगाखेड) अभिजीत चक्के, प्रभाकर माळवे, सचिन राठोड, प्रतिज्ञा वझे, सीमा घनवटे, नारायण घनवटे यांच्यासह आदी महिला उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here