



🔹खेळाच्या माध्यमातून करियरचा मार्ग शोधा :- सौ रूपालीताई पंदिलवार जिल्हा परिषद सदस्य तथा नवनियुक्त गडचिरोली जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष
🔸खेळाच्या माध्यमातून व्यक्तिमत्व घडवा :- जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार
✒️भास्कर फरकडे(चामोर्शी,तालूका प्रतीनिधी)मो:-9404071883
चामोर्शी(दि.1डिसेंबर):-खेळाच्या माध्यमातून व्यक्तीतमत्वाचा विकास होतो सुदुढ आरोग्य ठेवण्यासाठी खेळ नेहमी खेळा युवकांनी काही वेळ खेळण्याकरीता दिला पाहिजे गामीण भागामध्ये क्रिकेट खेळाप्रती प्रचंड आवड दिसते आहे. खेळाच्या माध्यमातून करियरचा मार्ग शोधा असे प्रतीपादन आष्टी ईल्लूर क्षेत्राच्या जिल्हा परिषद सदस्या सौ रूपालीताई पंदिलवार यांनी उद्घघाटन प्रसंगी त्या अध्यक्ष स्थानावरून बोलत होत्या आष्टीच्या वतीने बालाजी टाऊन क्रिकेट क्लब महालक्ष्मी क्रिकेट महोत्सव 2022 क्रिकेट सामन्यांचे आयोजन केले होते. कीडा स्पर्धेसाठी पहिला. दूसरा. तिसरा. असे तिन पुरस्कार या ठिकाणी देण्यात येणार आहेत या स्पर्धेचे उद्घघाटन जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांचे हस्ते करण्यात आले यावेळी आजचे युग स्पर्धेचे आहे.
ग्रामीण भागात अनेक ठिकाणी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहेत या स्पर्धांमध्ये मोठया प्रमाणावर खेळाडू सहभागी होत असून खेळाडूंनी खेळाच्या माध्यमातून वयकितमतव घडवावा असे उद्घघाटना प्रसंगी बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ रूपालीताई पंदिलवार जिल्हा परिषद सदस्य होते प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य डाॅ.प्रभाकर पंदिलवार. पोलिस निरीक्षक कुंदन गावडे . माजी सरपंच गंगाधर पोटवार सामाजिक कार्यकर्ता संजयराव पंदिलवार अडपलीचे उपसरपंच महेंद्रबाबा आत्राम आदि बहुसंख्य मंडळी व स्पर्धेत भाग घेतलेले खेळाडू उपस्थीत होते





