Home महाराष्ट्र ब्रह्मपुरी येथे तेली समाजाचा मेळावा संपन्न..

ब्रह्मपुरी येथे तेली समाजाचा मेळावा संपन्न..

385

🔸परिचय मेळावा प्रसंगी विशेष उपस्थिती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा बहुजन विकास मंत्री विजय भाऊ वडेट्टीवार हे होते.

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रह्मपुरी(दि.1जानेवारी):- संत तुकोबांनी समाजाच्या उत्थानासाठी, बहुजनांच्या कल्याणासाठी केलेली अभंगाची रचना संत जगनाडे महाराज यांनी समाजापर्यंत पोहोचवले. हा समाज वेगवेगळ्या पोट जातीत विभागला आहे. म्हणूनच आपण सर्व संताजीचे लेकरे आहोत ही जाणीव ठेवून एकत्र येण्याची गरज आहे . सर्व शाखेने संताजी ची जयंती एकत्र साजरी करून संघटन दाखवून देणे आवश्यक आहे कारण संघटन ही शक्ती असते असे प्रतिपादन बहुजन विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार यांनी केले.

श्री संताजी मंडळ व विदर्भ तेली महासंघ शाखा ब्रह्मपुरी च्या वतीने स्थानिक श्री विठ्ठल-रुक्मिणी सभागृहात आयोजित संताजी जयंती , गुणवंतांचे गुणगौरव व वधू वर परिचय मेळावा प्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा बहुजन विकास मंत्री विजय भाऊ वडेट्टीवार यांनी केले. सदर मेळाव्याचे उद्घाटक म्हणून प्रा. रमेश पिसे हे होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य सूर्यकांत खनके, अध्यक्ष विदर्भ तेली महासंघ जिल्हा चंद्रपूर उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून धनराज मुंगले, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, किसनराव शिक्षण संस्था आरमोरी चे अध्यक्ष, शिक्षणमहर्षी भाग्यवान खोब्रागडे, दीपकभाऊ उराडे ,महाराष्ट्र इन्स्टिट्यूट अध्यक्ष प्रा. देवेंद्र पिसे ,कर्मचारी संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष उमेशभाऊ चिलबुले, प्रा.डॉ. नामदेवराव हटवार, डॉ. केशव शेंडे, नगर सेवक तथा गटनेता विलास विखार, नगरसेवक डॉ. नितीन उराडे, पंचायत समिती सदस्य स्थानेश्वर पाटील कायरकर, माजी उपसभापती नामदेवराव लांजेवार ,इत्यादी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे उद्घाटक प्रा. रमेश पिसे म्हणाले की, समाज वेगवेगळ्या पोट शाखेत विभागला असला तरी आपण सारे संताजीचे लेकरे आहोत म्हणून पोटशाखा तोडा व समाज जोडा असे आवाहन करीत समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांनी आपले भविष्य निर्माण करून मोठे अधिकारी बनावे व समाजाची सेवा करावी असे आवाहन केले .प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. नामदेवराव हटवार यांनी समाजाची शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय परिस्थिती परिस्थिती समाजासमोर मंडित आजचा समाज व समाजासमोरील आव्हाने प्रतिपादन केले. प्राचार्य सूर्यकांत खनके यांनी जिल्हा स्तरावर राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती देत ब्रह्मपुरी येथील हा मेळावा म्हणजे जिल्ह्यातच नव्हे तर विदर्भाचा आदर्श मेळावा असल्याचे प्रतिपादन करीत इतरही जिल्ह्यातील लोकांनी या मेळाव्याचा आदर्श घ्यावा व अशा पद्धतीचे पद्धतीची नियोजन करावे असे म्हणाले.

प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांनी समाजातील मुलांनी उच्च शिक्षण घेऊन प्रशासकीय सेवेत सेवा द्यावी व सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे आवाहन केले. भाग्यवानजी खोब्रागडे यांनी मेळाव्याला शुभेच्छा देत समाज संघटनेवर भर दिला.याप्रसंगी उपवर वधु परिचय पुस्तिका स्पंदन मासिकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मेळाव्याची औचित्य साधून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यात अनेक रक्तदात्यांनी रक्तदान करून आपले सामाजिक व राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. समाजाच्यावतीने बहुजन बहुजन विकास मंत्री विजय भाऊ वडेट्टीवार यांचा भव्य पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.

पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. रवींद्र विखार प्रास्ताविक अध्यक्ष डॉ सतीश कावळे संचालन ॲड. मनीषा बडे व डॉ. मंजूषा साखरकर, जगदीश मेहेर तर आभार डॉ.रामेश्वर राखडे यांनी मानले .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. प्रभुदास चिलबुले, प्राचार्य सुयोग बाळबुधे, राकेश पडोळे, भाऊराव कावळे ,डॉ. रवींद्र विखार, राजेंद्र ठोंबरे ,आत्माराम आंबोरकर , अर्चना भोले, वनिता करंबे, सुद्धा बावनकुळे, कीर्ती झाडे, सी एम पडोळे ,केशव करंबे ,मंगेश आकरे , दिवाकर ठाकरे, रामकृष्ण कांबळी, कळंबे , तूलेश्वरी बालपांडे ,अर्चना मेहेर ,डॉ. अनिता विखार, कोल्हे गुरुजी इत्यादींनी मोलाचे सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here