Home महाराष्ट्र महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे फुले दांपत्य सन्मान दिवस उत्साहात साजरा

महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे फुले दांपत्य सन्मान दिवस उत्साहात साजरा

338

🔸तात्यासाहेब व माईंनी १ जाने, १८४८ शाळा सुरू करून ऐतिहासिक शैक्षणिक क्रांती केली – पी.डी.पाटील.

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगाव(दि.१जानेवारी):-२०२२ शनिवार रोजी सुवर्णमहोत्सवी शाळा – महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे फुले दांपत्य सन्मान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख एस.एन.कोळी यांनी केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. पी.आर. सोनवणे होत्या. याप्रसंगी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले व विद्येची खरी देवता सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेच्या मुख्याध्यापिका पी. आर. सोनवणे, ज्येष्ठ शिक्षिका एम.के.कापडणे पर्यवेक्षक जे.एस.पवार उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनी व कर्मचारी वृंद यांनी केले.

या फुले दांपत्य सन्मान दिवसाचे औचित्य साधून शाळेतील उपशिक्षक पी.डी. पाटील यांनी तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांचा जीवन संघर्ष उलगडून त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. या दाम्पत्यांनी १ जानेवारी, १८४८ ला मुलींची पहिली शाळा सुरू करून ऐतिहासिक शैक्षणिक – सामाजिक क्रांती केली व खऱ्या अर्थाने महिलांना गुलामगिरीतून मुक्त करून स्वावलंबी होण्याचा मार्ग सुकर केला. आज गावाच्या सरपंचपदापासून तर देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत महिला सन्मानाने जगत आहे याचे संपुर्ण श्रेय या फुले दाम्पत्याला जाते असे प्रतिपादन पाटील यांनी केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ.पी. आर. सोनवणे यांनी तात्यासाहेब व माईंचे कार्य सांगून त्यांच्या विचारांवर चालून शिक्षणामध्ये प्रगती करून दाखवणे हीच त्यांना आदरांजली ठरेल. मी आज मुख्याध्यापिका पदावर विराजमान आहे हे सर्व श्रेय तात्यासाहेब व माईंचे आहे. सर्व विद्यार्थी बालक मित्रांना व शिक्षक वृंद यांना नवीन वर्षाच्या मन : पूर्वक शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन एस. एन.कोळी तर आभार हेमंत माळी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक बंधू – भगिनी व कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here