Home महाराष्ट्र ईल्लूर येथील तरुणाची आत्महत्या

ईल्लूर येथील तरुणाची आत्महत्या

115

🔺शेतशिवारात घेतला गळफास

🔺अजय मनमिळाऊ स्वभावाचा असल्याने तरूण वर्गात हळहळ व्यक्त केली जात आहे

✒️भास्कर फरकडे(चामोर्शी,तालूका प्रतीनिधी)मो:-9404071883

चामोर्शी(दि.1जानेवारी):-तालुक्यातील ईल्लूर येथील तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली असुन आत्महत्या करणाऱ्या तरुणांचे नाव अजय वासुदेव आत्राम वय २५ असे असून तो आज १.०० वा.चे दरम्यान आपल्या पत्नीला मी शेताकडे जात आहे असे सांगितले व जाउ लागला पत्नी त्याचे मागे जात होती .अजय पुढेच जाऊन शेतशिवारा लगतच्या झाडास गळफास घेतला पत्नी मागेच जात असल्याने शेतात तो दिसला नाही म्हणून आजूबाजूला पाहिले असता अजय गळफास घेतल्याचे दिसून आले तेव्हा तिने त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केला व आरडाओरड केली.

तेव्हा शेजारच्या लोकांनी मदतीचा हात दिला व लागलीच ग्रामिण रुग्णालया आष्टी येथे उपचारासाठी दाखल केले मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. मृतकाचे लग्ण दिड वर्षांपूर्वी झाले होते .व पती पत्नी त्यांच्या भावंडापासून वेगळे राहत होते.त्याने आत्महत्या का केली हे कळू शकले नाही. पण अजय हा गावात मनमिळाऊ स्वभावाचा असल्याने युवक वर्गात हळहळ व्यक्त केली जात आहे.अधिक तपास पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी पोलीस करीत आहेत.

Previous articleने.ही. विद्यालय नवेगाव पांडव येथे निरोप समारंभ संपन्न…
Next articleज्ञानज्योती सावित्रीमाई फुले जयंती निमित्त धरणगाव येथे आढावा बैठक….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here