Home महाराष्ट्र ने.ही. विद्यालय नवेगाव पांडव येथे निरोप समारंभ संपन्न…

ने.ही. विद्यालय नवेगाव पांडव येथे निरोप समारंभ संपन्न…

91

🔹ने.ही. विद्यालय नवेगाव पांडव येथे निरोप समारंभ संपन्न…

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

नागभीड(दि.31डिसेंबर):-ने.ही. विद्यालय नवेगाव पांडव येथे निरोप समारंभ पार पडला. आज ने. ही.विद्यालय नवेगाव पांडव येथुन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. के. एस. पेंद्राम साहेब सेवानिवृत्त झाले. त्यानिमीत्ताने त्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. पी. एस. ठाकरे साहेब हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. श्री. विट्ठलरावजी बोरकुटे हे उपस्थीत राहिले.

या कार्यक्रमाच्या निमित्याने विद्यालयातील शिक्षक श्री. सतिश डांगे सर, श्री. ललित महाजन सर, श्री. मुनिराज कुथे सर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे शिक्षक श्री एन. बी. चुर्हे सर यांनी केले व आभार प्रदर्शन श्री. रेवणाथ ठवरे सर यांनी केले. श्री पी. एस. ठाकरे साहेब यांच्या अध्यक्षीय भाषणा नंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here