Home गडचिरोली कोविड योध्यांना न्याय मिळून देण्याचे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांचे आश्वासन

कोविड योध्यांना न्याय मिळून देण्याचे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांचे आश्वासन

79

🔹थकीत मानधन मिळूवून देण्याकरिता महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या कडे कोविड योध्यांची मागणी

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.31डिसेंबर):-मागील दोन वर्षांपासून संपूर्ण देशावर कोरोना चे सावट पसरलेले असतांना वैद्यकीय क्षेत्रात मोठया प्रमाणात कर्मचाऱ्यांची कमतरता होती अशा परिस्थितीत या संकटावर मात करण्यासाठी मार्च 2020 पासून सफाई कामगार व वॉर्ड बॉय म्हणून कंत्राटीने पद्धतीने काही कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करण्यात आले परंतु 2021 वर्षातील काही कर्मचाऱ्यांचे अद्यापही मानधन मिळालेले नाही. थकीत मानधन लवकरात लवकर मिळवून देण्याकरिता रुपेश चौधरी, यांच्या शिसष्टमंडळाने जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या कडे मागणी केली. कोविड योध्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या परीने सर्वोतोपरी प्रयत्न करून कोविड रुग्णालयात सेवा दिली.

कोविड योध्यांचा सन्मान करणे हे आमचे पहिले कर्तव्य असून त्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्याकरिता शासन दरबाबरी सर्वोतपरी प्रयत्न करणार व लवकरात लवकर थकीत मानधन मिळवून देणार असे आश्वासन महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी रुपेश चौधरी आणि त्यांच्या शिष्टमंडळाला दिले. यावेळी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष शंकरराव सालोटकर, कांग्रेस नेते कृष्णा झंजाळ, वसंत राऊत, जितेंद्र मुनघाटे, प्रसिद्ध समाजसेवक वसंत कुलसंगे, समीर मेश्राम, माणिक मानकर, मनोज चिकराम, विलास गोरडवार, अक्षय कांबळे, सचिन चौधरी, निखिल भोयर, चंद्रशेखर मेश्राम, कृष्णा लाहलवार, उद्देश कामीडवार, शशांक बदलवार, विकेश उठलवार, चेतन खंडारे, सोजी लाहलवार, सचीन मेश्राम, अक्षय मानापुरे, विनोद माळी आदी यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here