



🔹पत्रकार उत्तम बोडखे आणि आदर्श शिक्षिका बबीताताई बोडखे यांची प्रतिवर्षी किल्ला वारी
✒️आष्टी :प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)
आष्टी(दि.31डिसेंबर):-महाराष्ट्र ही संतांची आणि वीरांची भूमी आहे.अशा या संत परंपरांचा पूज्य पुण्यभूमीत संतांच्या विविध धर्मस्थळांना आणि छत्रपती शिवाजी महाराज,राजे संभाजी महाराजांच्या रायगडासारख्या किल्ल्यांना भेटी देऊन कृतकृत्य होण्यात धन्यता मानणारा बोडखे परिवार यांचा दरवर्षीचा नित्यनियम राष्ट्रप्रेम निर्माण करणारा आहे.दैनिक झुंजारनेताचे वरिष्ठ पत्रकार तथा उपसंपादक उत्तम बोडखे आणि त्यांच्या सौभाग्यवती आदर्श शिक्षिका बबीताताई बोडखे हा परिवार दरवर्षी एकदा नक्कीच महाराष्ट्रातील किल्ले, धार्मिकस्थळे यासह ऐतिहासिक स्थळांना भेट देण्यात धन्यता मानतो. यामधून नक्कीच त्यांना समाधान व मनामध्ये राष्ट्रप्रेमाची ज्याज्वल्य राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण होते असा त्यांचा विश्वास आहे.
यंदा नुकतीच त्यांनी सपत्नीक रायगड,शिवनेरी,प्रतापगड,पंढरपूर,
कोल्हापूर,सोलापूर यासह विविध ऐतिहासिक धार्मिक शैक्षणिक आदीसह पवित्र स्थळांना भेटी देऊन नतमस्तक होऊन समाजकार्यासाठी आशीर्वाद घेतले.पत्रकार उत्तम बोडखे हे दैनिक झुंजारनेताचे उपसंपादक असुन त्यांची २० वर्ष लेखणीची प्रचंड समाजसेवा सर्वश्रुत आहे.
शरदचंद्रजी पवार साहेब,लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या कौतुकास पात्र ठरलेले उत्तमराव आज तागायत गोरगरीब,शेतकरी,शेतमजूर आणि वंचित घटकांचे प्रश्न सातत्याने रस्त्यावर मांडण्याचे काम प्रामाणिकपणे करतात तर गुणवंतांना न्याय देत अनेकांचे अश्रू पुसण्याचे काम अविरतपणे करतात तर त्यांच्या सौभाग्यवती आदर्श शिक्षिका बबीताताई बोडखे या आपल्या अध्यापन कार्यातून तमाम शिक्षण क्षेत्रामध्ये आदर्शवत भूमिका निभावत कर्तव्य करतात.बोडखे परिवारांच्या आणि त्याची धार्मिक अशा पवित्र स्थळांना भेटी देण्याचा दरवर्षीचा नित्यक्रम मात्र तमाम तालुक्यासह सर्वांनाच वेगळेपण आणि वैशिष्ट्यपूर्ण राहिलेला आहे.त्यांच्या नित्य राष्ट्रप्रेम निर्माण करणाऱ्या नित्यक्रमाला आष्टी,कडा यासह विविध भागातील राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील समाजधुरीणांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या.


