Home अमरावती शिवसेना नेते ओंकार ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

शिवसेना नेते ओंकार ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

273

✒️प्रदिप रघुते(अमरावती प्रतिनिधी)मो:-9049587193

🔹वृक्षारोपण व रुग्णांना फळ वाटप

🔸रक्तदान शिबिर संपन्न50 रक्तदात्यांनी केले रक्तदान

अमरावती(दि.31डिसेंबर):-महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार कोरोना संक्रमण काळात रक्ताचा तुटवडा भासू नये याकरिता केलेल्या जाहीर आवाहनानुसार ओंकार ठाकरे यांच्या 50 व्या वाढदिवसा निमित्ताने रक्तदान शिबिर, रूग्नालयाच्या रूग्णांना फळ वाटप कार्यक्रम तसेच बाजार समितीतील शेतकऱ्यांना विविध भेटवस्तू देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला. रक्तदान शिबिरामध्ये 50 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

यावेळी प्रामुख्याने मधुकर कोठाडे, निलेश गाडेकर, सतिश गिड्डे, सचिन चौधरी, गणेश वेळूकार ,जावेदभाई, अनिल ढोके, स्नेहल प्रभाते, चेतन सुने, बाबु ससनकर, प्रमोद ठाकरे, विलास सावदे, मंगरूळ येथील सरपंच निलेश निंबर्ते, येवती येथील सरपंच गोकुळ राठोड, अमोल दांडगे, मनदेव चव्हाण, निलेश ईखार, अरुण लाहबर, निलेश इंगोले, अमित शिंदे, शंकर रावेकर यांचेसह गावातील सर्व शिवसेनेचे कार्यकर्ते व मिञमंडळी उपस्थित होते.

या छोटेखानी नांदगाव खंडेश्वर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात 51 वृक्षांचे रोपण करण्यात आले यावेळी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ उपस्थित होते या कार्यक्रमानंतर नांदगाव खंडेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात यामध्ये रुग्णांना फळवाटप करण्यात आले या कार्यक्रमाला शहरातील प्रतिष्ठित नागरिकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाची चांगलीच चर्चा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here