



✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100
म्हसवड(दि.31डिसेंबर):-सुप्रसिद्ध विचारवंत, परिवर्तनवादी चळवळीतील अभ्यासू व्यक्तिमत्त्व डॉ. शरद गायकवाड यांचे वडील राजाराम गायकवाड यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते ७८ वर्षांचे होते.
काही दिवसांपूर्वी राजाराम गायकवाड यांची प्रकृती बिघडत होती. दरम्यान त्यांना सातारा येथील रुग्णालयात ॲडमिट करून त्याच्यावर उपचार करण्यात आले होते. त्यातून ते बरेही झाले होते. बरे झाल्यापासून अंगापूर वंदन या आपल्या मूळ गावी ते वास्तव्य करून होते. मात्र काल पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा डॉ. शरद गायकवाड, व तीन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे.





