



✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)
आष्टी(दि.30डिसेंबर):-प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अँड.बी.डी.हंबर्डे महाविद्यालयात दि.१जानेवारी २०२२ रोजी सकाळी दहा वाजता काही स्वप्नांचं असंच असतं या कवितासंग्रहाच्या कवयित्री अमृता नरसाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत नववर्षरंभी कविता उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
संस्थाध्यक्ष किशोर नाना हंबर्डे,सचिव अतुल शेठ मेहेर,सर्व संचालक मंडळ,प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गेली पंधरा वर्षापासून असा नववर्षारंभी कविता उत्सव घेण्यात येतो.यावेळी प्रसिद्ध गझलकार श्रीराम गिरी यांना हंबर्डे महाविद्यालय आणि भाऊ फाउंडेशनच्या वतीने बन्सीधरराव धोंडीबापू हंबर्डे साहित्य पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.रोख रक्कम १००१ रु,स्मृतिचिन्ह,शाल,श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.असे भाऊ फाऊंडेशनचे कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन यांनी सांगितले.कार्यक्रमात कवितांची मैफल रंगणार आहे.
कविता उत्सवाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ.बाबासाहेब मुटकुळे,प्रा.अविनाश कंदले प्रा.अशोक भोगाडे,सर्व प्राध्यापक,कर्मचारी परिश्रम घेत आहेत.


