



🔹शिव-फुले-शाहू-आंबेडकरविरोधी नरहर कुरुंदकरच्या भूमिकेची चिकित्सा
✒️प्रतिनिधी गडचिरोली(चक्रधर मेश्राम)
गडचिरोली(दि.30डिसेंबर):-डॉ. विलास खरात (डायरेक्टर डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटर, नवी दिल्ली लिखित असलेल्या महत्त्वाचे, ऐतिहासिक पुस्तकाचे प्रकाशन १ जानेवारी २०२१ रोजी भारत मुक्ती मोर्चाच्या भव्य जाहीर सभेत मा. वामन मेश्राम यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.नरहर कुरुंदकर यांचा दावा होता की, त्यांना तर्काने, पुराव्याने हरविणारा कोणी असेल तर हेच त्यांचे मरण असेल! कुरूंदकरांच्या सर्वच भूमिकांचे खंडन लेखक डॉ. विलास खरात यांनी केले आहे. नरहर कुरूंदकरांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांची केवळ बदनामीच केली नाही तर त्यांचे चरित्रहनन देखील केले.
छत्रपतींच्या घराण्याबद्दल भयंकर तिरस्कार कुरुंदकरांचा असण्यामागे ब्राम्हणी वर्चस्व हाच आहे. एवढेच नाही तर कुरूंदकरांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा वास्तविक इतिहास कळू नये म्हणून योजनापूर्वक विकृत, आक्रस्ताळपणे लेखन केले. मुळात कुरूंदकर मराठाद्वेषी व सत्यशोधक चळवळी विरुद्ध होते. कुरुंदकरांनी फुले-शाहू, आंबेडकर यांची बदनामी करणारे लेखन केले आहे. त्यांच्या भूमिकेचे खंडन करणे नितांत गरजेचे होते. मराठवाड्यात कुरूंदकरांच्या नावाने एक पंथच आहे. त्या पंथाने कुरुंदकरांच्या विकृत व बहुजनद्वेषी लेखनाचा हेतुपूर्वक प्रचार करून सामाजिक वातावरण नेहमी कलुषित करीत असतात. त्या कुरुंदकर पंथास आता चपराक बसणार आहे. कुरुंदकर पंथाचा शेवट होईल!
समाजवादी ब्राम्हण नरहर कुरुंदकर यांनी फुले, शाहू, आंबेडकर यांच्या बद्दल जे विषारी लेखन केले आहे त्याचे सप्रमाण खंडन-मंडन या ग्रंथात आहे. फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीला काउंटर करण्यासाठी व महाराष्ट्रात ब्राम्हणांची सत्ता, व्यवस्था स्थापित करण्यासाठी नरहर कुरुंदकर यांनी काय काय खेळी खेळल्या, काय काय षड्यंत्र केले हे नव्या पिढीला जाणून व समजून घेणे गरजेचे आहे. डॉ. विलास खरात यांनी सदरील ग्रंथ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पीएचडी साठी सादर केला आहे व त्यांना या संशोधनाबद्दल विद्यापीठाने पीएचडी डिग्री ही दिली आहे. या ग्रंथामुळे वैचारिक वादळ निर्माण होईल व चळवळीला दिशा तसेच गती मिळेल! सदरील ग्रंथावर येत्या काळात मराठवाड्यात जाहीर परिसंवाद,चर्चासत्र ही आयोजित केले जातील.


