



बाबा!! इतिहास बनाती इस रफ्तार में आप हो, हमारे हर आगाज में आप हो, जो देखो बीड वासियों की आंखो में आज, सच कहती हूं खुशी से नम हर आंखो के अंदाज में आप हो..प्रसंग जो भी हो हर नारे की आवाज में आप हो !!
✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114
गेवराई(दि.30डिसेंबर):-जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा रेल्वे प्रकल्प आता पूर्णत्वाकडे जात असल्याचे दिसून येत आहे. अहमदनगर ते आष्टी या 60 किलोमीटर अंतराचे काम पूर्ण झाले असून बुधवारी सकाळी नगरहून सोलापूर वाडी व तेथून आष्टीपर्यंत रेल्वे धावली आहे. पटरीवरून रेल्वे धावल्याचे पाहून जिल्हावासियांना स्वप्न पूर्ण होत असल्याने आनंद ओसंडून वाहत होता. त्यानंतर, आज या मार्गावर हायस्पीड रेल्वे धावली. पंकजा मुंडेंनी या रेल्वेचा फोटो शेअर करत गोपीनाथ मुंडेंच्या आठवणी जागवल्या आहेत.
सद्यस्थितीत अहमदनगर-बीड-परळी हा प्रकल्प तीन हजार कोटींच्या पुढील असून नगर ते आष्टी साठ किलोमीटरची पटरी रेल्वे धावण्यासाठी सज्ज झाली असताना मागील महिन्यात धावणारी रेल्वे तांत्रिक अडचणीमुळे धावली नव्हती. पण, बुधवारी सकाळी नगरवरून आष्टीच्या दिशेने मार्गस्थ झाली. बीड जिल्हावासियांना गेल्या अनेक वर्षापासूनचे रेल्वेचे स्वप्न होते ते अखेर पूर्णत्वाकडे जात असल्याचे पाहावयास मिळाले. सोलापूर वाडी, कडा, आष्टी या ठिकाणीहून रेल्वे धावल्यामुळे ते पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. त्यात, आज आणखी एक स्वप्न साकार झाल्याचे पंकजा यांनी ट्विटमध्ये म्हटले होते. पंकजा यांनी आज हायस्पीड रेल्वेचं बीडमध्ये आगमन झाल्याचा फोटो शेअर करत गोपीनाथ मुंडेंची आठवण काढली आहे. या रेल्वेवर गोपीनाथ मुंडेंचा फोटोही लावण्यात आला होता.
बाबा!! इतिहास बनाती इस रफ्तार में आप हो,
हमारे हर आगाज में आप हो,
जो देखो बीड वासियों की आंखो में आज,
सच कहती हूं खुशी से नम हर आंखो के अंदाज में आप हो..
प्रसंग जो भी हो हर नारे की आवाज में आप हो !!
बाबा, या सगळ्या प्रक्रियेत आपण आहात, येथील प्रत्येकाच्या आवाजात आपण आहात, असे पंकजा यांनी ट्विटरवरुन म्हटलंय.


