Home महाराष्ट्र लोकं निघाले दुचाकी गाडीने, झोडपून काढलंय गारीने

लोकं निघाले दुचाकी गाडीने, झोडपून काढलंय गारीने

391

🔹मेघगर्जना व गारपिठ सह मुसळधार पावसाने लावली हजेरी

✒️भास्कर फरकडे(चामोर्शी,तालूका प्रतीनिधी)मो:-9404071883

चामोर्शी(दि.29डिसेंबर) तालुक्यातील भेंडाळा परिसरात आज अचानक ३ वाजेच्या सुमारास अवकाशात ढगांची निर्मिती होत मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा सुटला व अचानक गारपीट सूरू झाल्याने विविध कामानिमित्त घरा बाहेर पडलेल्या लोकांना गारीने झोडपून काढले. शाळेची सुट्टी आणि निसर्गाचा कोप याची वेळ सुद्धा तंतोतंत जुळल्याने शालेय विद्यार्थ्यांना सुद्धा या परिस्थितीचा सामना करावा लागला. अवकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी बांधवाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सध्या टॅक्टर व यंत्राच्या सहाय्याने धान मळणीची कामे सर्वत्र जोमाने सुरू आहेत. काही शेतकऱ्यांची धान्य शेतातच काढले आहेत, तर बऱ्याच शेतकऱ्यांची पुंजणे जैसे थे आहेत.अशा अचानक होणाऱ्या अवकाळी मुसळधार पावसाने धानाच्या ढिगाऱ्यात (पुंजण्यात) पाणी घुसून मोठे नुकसान होण्याची संभावना नाकारता येत नाही. शेतकऱ्यांच्या हातात आलेला घास निसर्गाने हिरावून घेण्यास कोपला असल्याचे चित्र दिसून येत असल्याने सर्वत्र खंमग चर्चेचा उत दिसून येत आहे. शेतकरी वर्गात असंतोष निर्माण झाला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here