



✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
चिमूर(दि.29डिसेंबर):-मानवाधिकार सहायता संघ (भारत) च्या वतीने प्रियदर्शनी सभागृह चंद्रपूर येथे राज्य कार्यकर्ता शिबीर व समाजभूषण पुरस्कार सोहळा नुकतेच संपन्न झाले.यावेळी चिमुरचे समाजसेवक, ग्रंथमित्र सुभाष शेषकर यांचा सपत्नीक वंदनाताई शेषकर यांचेसह सत्कार करण्यात आला. तसेच जेष्ठ कार्यकर्ता भिमराव ठावरी, नेहरू कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य सुधीर पोहनकर, डॉ. संजय पिठाडे, सेवानिवृत्त लेखापाल रामभाऊ खडसिंगे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या निताताई लांडगे यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी मानवाधिकार सहायता संघ (भारत) संस्थापक डॉ. सोनु सिंह, राष्ट्रीय उपाध्यक्ष शनेन्द्र शर्मा, सामाजिक कार्यकर्त्या वंदनाताई शेषकर, चंद्रपूरचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जेष्ठ समाजसेविका नंदाताई अल्लूरवार, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवी धारणे, हेमंत डोर्लीकर, जेष्ठ समाजसेवक केशवराव वरखेडे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
समाजभूषण सोहळा सदैव समाजाच्या जागृतीसाठी व उन्नतीसाठी प्रेरणा देत राहील असे मनोगत पुरस्कर्त्यांनी व्यक्त केले. समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. चंद्रभान खंगार, किशोर भोयर, सामाजिक कार्यकर्ता केमदेव वाडगुरे, मिलिंद जांभुळे, रामदास ठुसे, मंगलाताई वेदी, नर्मदा भोयर आदीने अभिनंदन केले.


