




✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)
नाशिक(दि.29डिसेंबर):- स्मार्ट सिटी कंपनी स्थापन झाल्यापासून नाशिक महानपालिकाने आपल्या हिश्यापोटी स्मार्ट सिटी कंपनीला रु.200 कोटीं अदयापपर्यंत दिलेले आहे. त्यापैकी रु.150 कोटी स्मार्ट सिटी कंपनीने बँकेमध्ये मुदत ठेवी स्वरुपात ठेवलेले होते कंपनीचे अध्यक्ष श्री सिताराम कुंटे साहेब यांचेकडेस या बाबतचा विषय काढुन महाननगरपालिकेला 150 कोटी रुपये सदयस्थितीमध्ये मनपाचे विविध विकास कामांसाठी वर्ग करावे असा मागणी सातत्याने केलेली होती तसेच अनेक वेळा स्मार्ट सिटीच्या बैंठकांमध्ये सविस्तर चर्चा केली होती परंतू स्मार्ट सिटीने याबाबत सातत्याने दुर्लक्ष करुन शहराच्या विकासाच्या दृष्टीकोनातुन अत्यावश्यक असणारा निधी उपलब्ध करुन दिलेला नाही. सदरची रक्कम स्मार्ट सिटी कंपनीने बॅकेत ठेव म्हणुन ठेवलेली आहे. त्याकारणाने मनपाची विकास कामे वेळेत होउ शकली नाही
स्मार्ट सिटीचे नव्याने नियुक्त झालेले मुख्यअधिकारी श्री सुंमंत मोरे यांच्या समवेत चर्चा करुन बँकेत ठेवलेल्या 150 कोटी रुपयांचे व्याज मनपाला वर्ग करावे असे सुचित करण्यात आले त्याप्रमाणे त्यांनी सकारात्मक विचार करुन व्याजापोटी मिळणारी रक्कम रु.25 कोटी मनपास वर्ग करणेचे तत्वता मान्य करुन त्याबाबत ते मा.आयुक्तांकडे येत्या 1-2 दिवसात पत्रव्यवहार करुन रक्कम वर्ग करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे नाशिक महानगरपालिकेला विकास कामांसाठी नव्याने रुपये 25 कोटी उपलब्ध होणार असल्याने निधी अभावी प्रलंबित ठेवण्यात आलेली विकासाची कामे मार्गी लागणार असल्याचे मा.महापौर श्री सतिश नाना कुलकर्णी यांनी सुतोवाच केल आहे.




