Home महाराष्ट्र धारूर येथिल बालाजी देवस्थान इनामी जमिन, ३८ कोटी रूपयांचा महसुल बुडवला, बेकायदेशीर...

धारूर येथिल बालाजी देवस्थान इनामी जमिन, ३८ कोटी रूपयांचा महसुल बुडवला, बेकायदेशीर हस्तांतरण अपर जिल्हाधिकारी अंबाजोगाई यांचा अहवाल; गुन्हे दाखल करा

298

🔸शासनाचा ३८ कोटी २२ लाखांचा महसुल बुडवला

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.29डिसेंबर):-श्री. बालाजी मंदिर, कटघरपुरा धारूर या देवस्थानच्या ६६ एक्कर जमिनी वर्ग ३ च्या असताना बनावट दस्तावेज तयार करून वर्ग २ दाखवून खालसा करून खाजगी मालकी घोषित केल्याबद्दल तसेच वर्ग २ मधुन वर्ग १ करताना नियमाप्रमाणे ३८,२२,५८००(अडोतीस कोटी बावीस लाख अठ्ठावन्न हजार)रूपयांचे चलन भरणा करणे बंधनकारक असताना ते भरून न घेताच उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव पाटील, तहसिलदार वंदना सतिशराव शिरोडकर, मंडळ आधिकारी नजीर महम्मदशफी खुरेशी, प्रमोदकुमार शरदकुमार तिवारी, दुष्यंत प्रमोदकुमार तिवारी यांनी शासनाचा कोट्यावधी महसुल बुडवून फसवणूक केल्याबद्दल गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत महसुल मंत्री, प्रधान सचिव, गृहमंत्री, विभागीय आयुक्त औरंगाबाद यांना केली आहे.
.
सविस्तर माहीतीस्तव:-
___
श्री बालाजी मंदिर, कटघरपुरा ता. धारूर जि.बीड या देवस्थानची ६६ एक्कर जमिन सर्व्हे नंबर ३५९,३६३ व ५५१ हे देवस्थान इनाम वर्ग ३ असुन तशी सहाय्यक धर्मादाय आयुक्त बीड यांच्याकडे नोंदणी आहे तसेच महाराष्ट्र शासनाचे राजपत्र दि. १८ ऑगस्ट १९९० मध्ये सदर सर्व्हे नंबर देवस्थानच्या मालकीचे असल्याचे नमुद केलेले असून उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठासमोरील याचिकेत निर्णय होऊन सर्वे नंबर बालाजी मंदिर देवस्थान मालकीचे असल्याचे घोषित केले आहे.
मंडळ आधिकारी धारूर एन एम खुरेशी यांनी प्रमोदकुमार शरदकुमार तिवारी, दुष्यंत कुमार प्रमोदकुमार तिवारी, उपजिल्हाधिकारी भु-सुधार प्रकाश आघाव पाटील, तहसिलदार वंदना सतिशराव शिरोडकर यांनी संगनमतानेच सर्वे नंबर ३५९,३६३ व ५५१ मधिल जमिन वर्ग ३ असताना बनावट कागदपत्रान्वये वर्ग २ दाखवणारा अहवाल मंडळ आधिकारी यांनी ५ ऑक्टोबर २०२० रोजी आणि तहसिलदार यांनी ६ ऑक्टोबर २०२० रोजी उपजिल्हाधिकारी भु-सुधार बीड यांना सादर करून त्या आधारे दि.४ नोव्हेंबर २०२० रोजी प्रमोदकुमार शरदकुमार तिवारी, दुष्यंत कुमार प्रमोदकुमार तिवारी यांचा अर्ज वर्ग २ मधुन वर्ग १ करणेबाबत असताना त्यामध्ये मागणी नसतानाही सदर जमिन खालसा असल्याचे घोषित केल्याचे भासवुन आदेश पारीत केला.

शासनाचा ३८ कोटी २२ लाखांचा महसुल बुडवला
___
सदर जमिन वर्ग २ मधुन वर्ग १ करताना महाराष्ट्र शासन यांचे शासन परिपत्रक क्र १०९९/प्र. क्र.२२३/ल-४ दिनांक ९ जुलै २००२ अन्वये मुल्यांकनाच्या ५० टक्के रक्कम शासनास नजराणा भरणे आवश्यक असते, सदर जमिनीचे मुल्यांकन रूपये ७६,४५,१६,०००( शहात्तर कोटी पंचेचाळीस लाख सोळा हजार)ईतके असून सदर रकमेच्या ५० टक्के रक्कम म्हणजेच ३८,२२,५८,००० (अडोतीस कोटी बावीस लाख अठ्ठावन्न हजार)एवढी नजराणा रक्कम चलनाद्वारे भरणा करून घेणे बंधनकारक होते परंतु तसे न करताच शासनाचा महसुल बुडवून फसवणूक केल्याबद्दल संबधित दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत

आधिकार क्षेत्रात नसताना बेकायदेशीर हस्तांतरण, अपर जिल्हाधिकारी अंबाजोगाई यांचा अहवाल
___
अपर जिल्हाधिकारी अंबाजोगाई मंजुषा मिसकर यांनी दि.३ नोव्हेंबर २०२१ रोजी सदरची जमिन खिदमत माश असतानाही महसुल अभिलेखाचा कोणताही अभ्यास न करता व विविध न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे अवलोकन न करताच श्री प्रकाश आघाव पाटील उपजिल्हाधिकारी भु-सुधार यांनी बेकायदेशीर आदेश पारीत केल्याचे सकृतदर्नी दिसुन येते म्हटले आहे.तसेच उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद व अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश माजलगाव यांच्या “स्टेटस को “आदेश असून सुद्धा आदेश डावलल्याचे म्हटले असून खिदमत माश जमिन वर्ग ३ असेल तर त्या जमिनीबाबतचे आधिकार उपजिल्हाधिकारी भु-सुधार यांना नाहीत असे नमुद केलेले आहे ,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here