Home महाराष्ट्र नाशिक पाटात पोहण्यासाठी गेलेल्या तीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू

नाशिक पाटात पोहण्यासाठी गेलेल्या तीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू

109

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

नाशिक(दि.29डिसेंबर):-शहरातील मखमलाबाद परिसरात पाटात पोहण्यासाठी गेलेल्य तीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे या घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि नाशिक अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मखमलाबाद रोड वर असलेल्या पाटात पोहण्यासाठी शाळकरी मुले गेली होती त्या तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे.

बुडणाऱ्या मध्ये प्रमोद जाधव (13) निलेश मुळे (14 )सिद्धू धोत्रे (15 )यांचा समावेश आहे हे तिघेही पेठ रोडवरील नामको हॉस्पिटल मागील बाजू असलेल्या गजवक्र नगर मधील रहिवासी आहेत मुले बुडाल्याची कळताच गजवक्र नगर मध्ये गोंधळ उडाला व मुलांच्या कुटुंबीयांनी हंबरडा फोडला पात्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही बुडाल्याची सांगितले जात आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here