




✒️तलवाडा प्रतिनिधी(शेख आतिख)
तलवडा(दि.28डिसेंबर):-वढवणी येथील विजय मायकर यांच्या बालाजी इलेक्ट्रिकल व फर्निचर चे दुकान आगीत जळाल्याने त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून त्यांना एक व्यवसाय बांधव म्हणून बीड येथील साक्षी फर्निचर चे मालक तथा संत रविदास प्रतिष्ठान चे बीड जिल्हाध्यक्ष बाळासाहेब राऊत यांनी मदतीचा हात दिला.
समाज बांधवाने आणि व्यवसायिकांनी आपल्या व्यवसाय बांधवांना सहकार्य करावे ही भावना मनात ठेवत वडवणी येथील विजय मायकर यांच्या इलेक्ट्रिकल व फर्निचर या दुकानाला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाल्यानंतर आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द करून सहकार्य केले बाळासाहेब राऊत हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात व वेळोवेळी निराधार व गरजू ना मदत करतात परंतु यावेळी त्यांनी मैत्रीचे नाते सांभाळून मदत केली .यावेळी साक्षी फर्निचर चे मालक तथा संत रविदास प्रतिष्ठान चे बीड जिल्हाध्यक्ष बाळासाहेब राऊत जिल्हाउपाध्यक्ष नंदकुमार देवकुळे ,राम लोंढे , अशोक घुमरे,सौरभ शिंदे,वंचिष्ट शेंडगे,सावंत संतोष,व सहकारी मित्र उपस्थित होते.




