Home महाराष्ट्र नगराध्यक्ष विजयकुमार तापडियांनी विरोधकांवर मात करीत ‘अखेर करून दाखवलं

नगराध्यक्ष विजयकुमार तापडियांनी विरोधकांवर मात करीत ‘अखेर करून दाखवलं

311

🔸गंगाखेडला आज बहुचर्चित ९ कोटी रुपयांच्या विकासकामांचे खा.जाधवांच्या हस्ते उद्घाटन सोहळा

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी )

गंगाखेड(दि.28डिसेंबर):-शहरातील डॉ.आंबेडकर चौक ते दिलकश चौका पर्यंतचा सिमेंट रस्ता, नाली व पेवरब्लॉक या मुख्य रस्त्याच्या कामासह तब्बल ९ कोटी रुपयांच्या कामांना औरंगाबाद खंडपीठाकडून मंजुरी मिळवत नगराध्यक्ष विजयकुमार तापडिया यांनी शहरातील काही माजी लोकप्रतिनिधींंवर जोरदार मात केली असून उद्या दि.२९ डिसेंबर रोजी शहरात परभणीचे खासदार संजय जाधव यांच्या हस्ते भव्य उद्घाटन सोहळा होत आहे. या कार्यक्रमास शहरवासीयांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यक्रमाचे संयोजक तथा नगराध्यक्ष विजयकुमार तापडिया यांनी केले आहे.

 उद्या दि.२९ डिसेंबर रोजी शहरातील श्रीराम चौकात दुपारी २ वाजता परभणीचे खासदार संजय जाधव यांच्या हस्ते ९ कोटी रुपयांच्या विकास कामाच्या उद्घाटन सोहळा पार पडत आहे. या कार्यक्रमास संयोजक तथा नगराध्यक्ष विजयकुमार तापडिया यांच्यासहित शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीचे चेअरमन डॉ. सिद्धार्थ भालेराव, युवासेनेचे जिल्हाप्रमुख अर्जुन सामाले, डॉ.शांतीलाल काबरा, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दगडू सोमाणी, ज्ञानेश्वर महाजन, पंडितराव ईदाते, ॲड. नंदकुमार काकाणी, नितिन नळदकर यांची उपस्थिती असणार आहे.

      विशेषतह ९ कोटी रुपयांचा या विकासकामांना  नगराध्यक्ष विजयकुमार तापडिया यांनी महाराष्ट्र सरकारकडून विशेष प्रयत्न करून विकासनिधी ओढून आणला होता. मात्र काही लोकप्रतिनिधींनी यामध्ये तांत्रिक व न्यायालयीन आडकाठी आणल्यामुळे मागील दोन महिन्यापासून शहरवासीय विकास कामापासून वंचित होते. काहींनी तर नगराध्यक्ष विजयकुमार तापडिया यांच्याविरोधात पोस्टरबाजी करून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला परंतु अखेर नगराध्यक्ष तापडिया यांना औरंगाबाद खंडपीठाने मोठा दिलासा देऊन संबंधित नऊ कोटी रुपयांचा विकास कामांना कामांचा कार्यारंभ आदेश दिला आहे.

       बुधवारी दुपारी होणाऱ्या या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक तथा नगराध्यक्ष विजयकुमार तापडिया यांचेसहित शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अँड मनोज काकाणी, विधानसभा प्रमुख राम लटके, जिल्हा संघटिका सखुबाई लटपटे, तालुका। प्रमुख अनिल सातपुते, शहर प्रमुख जितेश गोरे भास्कर काळे युवासेना शहर प्रमुख गोविंद जाधव, कुंडलिक भडके, मंगेश भिसे, नगरसेवक चंद्रकांत खंदारे, माजी नगरसेवक प्रवीण काबरा, माजी नगरसेवक गोविंद अय्या, संदीप देवळे आदींनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here