Home महाराष्ट्र आमदार देवेंद्र भुयार यांच्या प्रयत्नातून रस्ते कामासाठी २१ कोटी ८६ लक्ष रुपयांचा...

आमदार देवेंद्र भुयार यांच्या प्रयत्नातून रस्ते कामासाठी २१ कोटी ८६ लक्ष रुपयांचा निधी मंजूर !

277

🔹मोर्शी तालुक्यातील विविध रस्त्यांच्या कामांना मिळाली मान्यता !

✒️मोर्शी(पुरोगामी न्युज नेटवर्क)

मोर्शी(दि.28डिसेंबर):-रस्ते सुरक्षितता हा, जीवन मरणाचा प्रश्न आहे.ही बाब लक्षात घेऊन मोर्शी वरुड तालुक्यातील विविध गावातील रस्त्यांची दुरावस्था झाली होती तर काही गावांचे रस्ते खराब झाल्याने दळणवळणाची मोठी समस्या निर्माण झाली होती. या समस्येमुळे खेड्यातील जनतेला आरोग्य व इतर महत्वाच्या सुविधा मिळवून घेण्यासाठी रस्त्या अभावी अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते ही बाब लक्षात घेऊन मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी मोर्शी मतदार संघातील विविध गावांना जोडणाऱ्या विविध रास्तेकामांसाठी २१ कोटी ८६ लक्ष रुपयांच्या निधीस मंजुरी मिळवली आहे. ग्रामीण भागात रस्ते विकासासह विविध पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी महाविकास आघाडी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी येथे केले. आमदार देवेंद्र भुयार यांच्या प्रयत्नातून मोर्शी तालुक्यातील रस्त्यांच्या कामांकरिता २१ कोटी ८६ लक्ष रुपयांचा निधी मंजुर झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.

आमदार देवेंद्र भुयार यांनी रस्ते विकासाच्या या कामांच्या मंजुरीसाठी मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्याकडे पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती आमदार देवेंद्र भुयार यांच्या मागणीची दखल घेऊन सन २०२१- २२ पुरवणी अर्थसंकल्पामध्ये मोर्शी तालुक्यातील चिखल सावंगी, चिंचोली गवळी रस्त्याची मोऱ्यासहित सुधारणा करणे २ कोटी २८ लक्ष रुपये. हिवरखेड ममदापूर लोणी हातूर्णा रस्त्याची मोऱ्यासहित सुधारणा करणे ७० लक्ष रुपये.पार्डी, पिंपळखुटा, नया वाठोडा लिहिदा, नेरपिंगळाई रस्त्याची मोऱ्यासहित सुधारणा करणे ३ कोटी ६३ लक्ष रुपये. राजूरवाडी भांबोर पिंपळखुटा तळणी रस्त्याची मोऱ्यासहित सुधारणा करणे २ कोटी ३० लक्ष रुपये.रिद्धपुर आष्टोली तरोडा खेड अंबाडा रस्त्याची मोऱ्यासाहित सुधारणा करणे ७ कोटी ८५ लक्ष रुपये. आष्टगाव अंबाडा करजगाव घटलाडकी रस्त्याची सुधारणा करणे , सायवाडा ते आष्टगाव पर्यंत लहान पुलाचे बांधकाम करणे २ कोटी ५० लक्ष रुपये. नसितपूर, येवती, पुसला, नेरपिंगळाइ रस्त्यावर लहान पुलांचे बांधकाम करणे २ कोटी ६० लक्ष रुपये. या सर्व रस्त्यांच्या कामांकरिता २१ कोटी ८६ लक्ष रुपयांची कामे मंजूर करून प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली असून लवकरच या कामाची निविदा प्रसिद्ध होऊन कामांना सुरुवात होणार आहे. दरम्यान या कामांमुळे दळणवळणाची सुविधा अधिक जलद होणार असल्याची प्रतिक्रिया आमदार देवेंद्र भुयार यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here