




🔸जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक बीड यांना तक्रार:-डाॅ.गणेश ढवळे
✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114
गेवराई(दि.28डिसेंबर):-शिरूर कासार तालुक्यातील सिंदफणा नदीपात्रातील अवैध उत्खनन प्रकरणात वारंवार निवेदन तसेच आंदोलनानंतर सामाजिक कार्यकर्ते अशोक कातखडे रा.निमगांव मायंबा यांच्यावर आज दि.२८ डिसेंबर मंगळवार रोजी सकाळी ६ वाजता अवैध वाळुचा ट्रक्टर प्रकरणात मंडळ आधिकारी अमोल मुंडे यांनी पकडलेला अवैध वाळुचा ट्रक्टर सोडून दिल्याची विचारणा केल्यानंतर तहसिलदार श्रीराम बेंद्रे यांच्या आदेशावरून सोडून दिल्याचे सांगितले. त्यानंतर सकाळी ११ वाजता नांदेवली ता.शिरूर येथिल वाळुमाफिया अंकुश आश्रुबा शेळके, रामनाथ भाऊसाहेब शेळके, आणि शिवाजी भिमराव व्हरकटे यांनी तलवारी घेऊन मारण्यासाठी घुसले असता अशोक कातखडे यांनी जीव वाचवण्यासाठी शेतात पळ काढला व सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांना कल्पना दिली
महसुल व पोलीस प्रशासनाला सामाजिक कार्यकर्त्यांचे मुडदे पाडायचे आहेत काय??जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक बीड यांना तक्रार:-डाॅ.गणेश ढवळे
____
अशोक कातखडे यांच्यावर यापुर्वीही हल्ल्याचा प्रयत्न झाल्यानंतर डाॅ.गणेश ढवळे यांनी विभागीय आयुक्त यांना तक्रार केल्यानंतर विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकारी बीड यांना संबधित प्रकरणात चौकशी करून नियमानुसार आवश्यक कार्यवाहीबाबत आदेश दिल्यानंतर सुद्धा कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, त्यानंतर दि.३ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनानंतर तसेच दि.१३ डिसेंबर रोजी विभागीय आयुक्त औरंगाबाद यांना तक्रार केल्यानंतर आज पुन्हा अशोक कातखडे यांच्यावर हल्ला झाला असून संबधित प्रकरणात उपविभागीय आधिकारी नामदेव टीळेकर, तहसिलदार शिरूर कासार श्रीराम बेंद्रे यांचा वाळुमाफियांशी साटेलोटे असुन संबधित प्रकरणात दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर, शेख युनुस च-हाटकर, मोहम्मद मोईज्जोदीन, सय्यद आबेद, उपाध्यक्ष मराठवाडा ऑल इंडीया पॅथर सेना नितिन सोनावणे यांनी जिल्हाधिकारी बीड, पोलीस अधीक्षक बीड यांना केली आहे.




