




🔸पूरोगामी संदेश वृत्ताची घेतली दखल
✒️श्री भास्कर फरकडे(चामोर्शी,तालूका प्रतीनिधी)मो:-9404071883
चामोर्शी(दि.28डिसेंबर):-गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात येत असलेल्या आष्टी शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या चपराळा मार्गावरील ईलूर.ठाकरी.आष्टी पेपर मिल.या ठिकाणी बांधकाम विभागाने गर्दीच्या ठिकाणाहून वाहन भरधाव वेगाने जाऊ नये व गतीरोधक जवळ ब्रेक करून वाहन हळू जावे गर्दीच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अपघात होऊ नये या करीता गतीरोधक बनविण्यात आले
पण या मार्गावरील गतीरोधकावर गतीरोधक दिसणार असे पेन्ट व फलक लावलेले नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. आष्टी हि चामोर्शी तालुक्यातील मोठी बाजारपेठ असल्याने या मार्गावर नेहमी वाहनांची मोठी वर्दळ असते या करीता संबंधित विभागाने लक्ष देऊन मोठा अपघात होण्या अगोदर आष्टी चपराळा मार्गावरील गतीरोधक वर पेन्ट व गतीरोधक फलक लावण्यात यावे अशी मागणी वाहन चालकाकडून व नागरिकांकडून होत आहे हि बातमी प्रसिद्ध होताच संबंधीत ठेकेदारानी गतीरोधक जवळ फलक लाऊन पेनट मारण्यात आले.




