



✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.28डिसेंबर):-मतदार संघातील युवा नेते संतोष भाऊ मुरकुटे यांनी अखेर मुबंई येथे महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये जनता पक्षात प्रवेश केला.
गंगाखेड विधानसभा मतदार संघातील तरुण नेते संतोष भाऊ मुरकुटे यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाअसून
आज मुंबईत झालेल्या एका सोहळ्यामध्ये विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी मुरकुटे यांचे अभिनंदन केले आणि त्यांना भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याबद्दल स्वागत केले.
जनतेच्या अडीअडचणी समस्या सोडवण्यासाठी प्रत्यक्ष मदतीचा हात देणारे संतोष भाऊ मुरकुटे भारतीय जनता पक्षात आल्याबद्दल अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.गेल्या अनेक दिवसांपासून संतोष मुरकुटे यांनी गंगाखेड विधानसभा मतदारसंघात जनतेचीअनेक कामे केली.भारतीय जनता पक्षाचे परभणी जिल्हा अध्यक्ष डॉक्टर सुभाष कदम,रबदडे मामा,प्रमोद वाकुडकर,बाबाबासाहेब जामगे यांच्यासह अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे


