Home महाराष्ट्र अत्याचार केलेल्या आरोपीस चौकशी करून शिक्षा देण्यासाठी चर्मकार समाज बांधव एकवटले

अत्याचार केलेल्या आरोपीस चौकशी करून शिक्षा देण्यासाठी चर्मकार समाज बांधव एकवटले

219

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा,प्रतिनिधी यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.29डिसेंबर):- येथील वसंत नगर येथे दि. 27 डिसेंबर 2021 रोजी गंगा कोरडे मुलीवर अत्याचार करुन फाशी घेण्यास प्रर्वत्त केले विजय हटकरे आरोपीने माणूसकीला काळीमा फासणारे वर्तन केले आहे.त्यास कठोर शिक्षा होण्यासाठी ऊमरखेड तालुक्यातील चर्मकार बांधव एकत्र आले असून जलदगती न्यायालयाची निर्मिती करून आरोपीस कठोरातील कठोर शिक्षा करावी.

अशी मागणी राष्ट्रीय चर्मकार महासंघ शाखा उमरखेड यांच्यातर्फे उपविभागिय अधिकारी तथा उपविभागिय दंडाधिकारी उमरखेड, चर्मकार विकास संघ यांच्यातर्फे नायब तहसिलदार काशिनाथ डांगे उमरखेड, पोलीस निरीक्षक अमोल माळवे यांना पोलीस स्टेशन उमरखेड चर्मकार बांधवांच्या नांव सहीसह देण्यात आले.यावेळी हरीश पाचकोरे,दत्ता गंगासागर, भिमराव ईटकरे, डाँ.व्ही.एस. ईंगळे, गजानन वानखेडे, सुधाकर ईटकरे, महादेव खंदारे, विनोद पिंपरखेडे, कैलास ईटकरे आदी समस्त चर्मकार बांधवांनी सदर घटनेबद्दल रोष व्यक्त केला आहे.चर्मकार विकास संघ ऊमरखेड तालुका अध्यक्ष गजानन नारायण वानखेडे (मरसुळकर) तथा उमरखेड तालुका प्रतिनिधी पत्रकार व हरीभाऊ रामचंद्र खंदारे सामाजिक कार्येकर्ते व पत्रकार यांनी दिले.

सविस्तर शहरातील वसंतनगर परिसरात भाड्याने राहणाऱ्या दंगल नियंत्रण पथकातील पोलिसाच्या घरात एका 20 वर्षीय मुलीचा गळफास घेवून लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने शहरात खळबळ उडाली असून ही घटना दरम्यान माझ्या मुलीवर अत्याचार करून तिला फासावर लटकविण्यात आल्याचा आरोप मृतक मुलीच्या वडिलाने पोलिसात तक्रार दाखल करून केला.आरोपी पोलिसाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.20 वर्षीय गंगा संजय कोरडे वेणी ता. पुसद असे मृतक मुलीचे नाव असुन 42 वर्षीय विजय हटकरे याने नौकरीचे अमिष दाखऊन अत्याचार केला.सदर आरोपिस कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी उमरखेड तालुका चर्मकार बांधवांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here