



✒️कुरंडी चक(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
कुरंडी चक(दि.27डिसेंबर):-येथील नंदकिशोर जमनादास मसराम यांना कुर्झा पारडी येथे संपन्न झालेल्या २८ व्या झाडीबोली साहित्य संमेलनात विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. साहित्य संमेलन समितीच्या वतीने संमेलनाचे बोधचिन्ह स्पर्धा आयोजित करण्यात आली . तेव्हा स्पर्धेत सहभागी प्रवेशीकेतून उत्कृष्ट बोधचिन्ह म्हणून नंदकिशोर मसराम यांचे बोधचिन्ह निवडण्यात आले. त्यामुळे साहित्य संमेलन समितीच्या वतीने मसराम यांना सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी माजी खा. मधुकर कुकडे, माजी समाजकल्याण मंत्री बडोले,डॉ. हरिश्चंद्र बोरकर , ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर , डॉ.निंबेकर, माजी आ. डॉ. हेमकृष्ण कापगते, कवी अरूण झगडकर, पुरूषोत्तम गोंधळे, कुंजीराम गोंधळे, जमनादास मेश्राम हे प्रामुख्याने उपस्थित होते.नंदकिशोर मसराम हे जि. प. प्राथमिक शाळा थोटेबोडी (ता. आरमोरी )येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहे. बालपणापासून त्यांना काव्य लेखनाची आवड असून नव्या तंत्रज्ञानाचाही उत्तम उपयोग करत अध्यापनाचे कार्य करीत आहे.ते उत्तम भजन गायक असून त्यांची इतिहास संशोधन वृत्ती महत्त्वाची आहे.





