



✒️राजुरा(पुरोगामी न्युज नेटवर्क)
राजुरा(दि.27डिसेंबर):- ग्रामीण भारत महीला गृह उद्योग मंडळ,चंद्रपुर व परिवार विकास फाऊंडेशन यांच्या संयुक्त उपक्रमाआधारीत दि.27/12/2021 ला जि. प. शाळा चुनाळा येथे आरोग्य मित्र हेल्थ कार्डच्या कँप घेण्यासंबधी महत्वपूर्ण मुद्देसुद चर्चासञ आणि हेल्थ कार्ड काढण्याचा शुभारंभ सुद्धा करण्यात आला. आरोग्यमिञ या कार्डमुळे चंद्रपुर व गडचिरोली जिल्ह्यातील नामांकीत खाजगी हॉस्पीटलमद्ये बहुतांश प्रमाणात सवलत/सुट मिळते. ग्रामीण व शहरी भागातील जनतेला आरोग्य सेवेचा लाभ घेण्याकरिता कळकळीची विनंती आहे.
या कार्ड चा अवश्य लाभ घ्या.असे चर्चेत सहभागी बाळनाथ वडस्कर साहेब सरपंच, निमकर पोलीस पाटील, साईबाबा ईंदुरवार मुख्याध्यापक जि. प. शाळा चुनाळा, आरोग्य केंद्र चुनाळा चे अंगणवाडी सेवीका व आशासेवीका मंदा धुर्वे, सोनाली वांढरे, वंदना वांढरे, व वसंता मारपेली मॅडम तसेच चांदेकर मँडम वैद्यकीय अधीकारी, आरोग्य उपकेंद्र,चुनाळा अशोकजी अंबागडे संचालक, ग्रामीण भारत, सौरभ मादासवार अध्यक्ष, कौ.वि.ब.संस्था प्रशिल भेसेकर संचालकीय सदस्य,ग्रामीण भारत व इतर शिक्षकगण उपस्थित होते.


