



🔸आष्टी वकील संघ व पत्रकार संघाने केले अभिनंदन
✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)
नागपूर(दि.26डिसेंबर):- येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाअंतर्गत मास्टर ऑफ क्रिमिनल लॉ.(एल.एल.एम.) च्या परीक्षेत आष्टी तालुक्यातील तवलवाडी गावचे भूमिपुत्र मा.न्यायाधीश एम.एच.पठाण यांनी गुन्हेगारी शास्त्र (पिनोलॉजी) या विषयात १०० पैकी १०० गुण घेऊन विद्यापीठात सर्वप्रथम येण्याचा मान मिळवला आहे.आष्टीच्या या भूमिपुत्राने नागपूर विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल आष्टी येथे शासकीय विश्रामगृहात आष्टी तालुका वकील संघ व पत्रकारांच्यावतीने सत्कार करून अभिनंदन केले.अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र.१ तथा विशेष न्यायाधीश म्हणून आष्टी तालुक्यातील तवलवाडी येथील मा.न्या.एम.एच.पठाण हे कार्यरत आहेत.त्यां
नी मे २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या कायद्यामधील पदवीधर पदवी (एल.एल.एम.) या परीक्षेत यांनी गुन्हेगारी शास्त्र (पिनोलॉजी) या विषयात १०० पैकी १०० गुण मिळवून नागपूर विद्यापीठात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.प्रथमच मराठवाड्यातील भूमिपुत्राने नागपूर विद्यापीठात सर्वप्रथम येण्याचा मान मिळवला आहे.कायदा या क्षेत्रात पीएच.डी करणार असल्याचा मानस यावेळी मा.न्या.पठाण यांनी व्यक्त केला.
आष्टी येथील मित्र परिवारांनी आष्टी येथील शासकीय विश्रामगृह येथे शनिवार दि.२५ डिसेंबर रोजी सत्कार करण्यात आला.यावेळी ॲड.राकेश हंबर्डे,ॲड.बाळासाहेब शेकडे,ॲड.महादेव मोहिते,ॲड.बप्पासाहेब खिलारे,पत्रकार उत्तम बोडखे,प्रविण पोकळे,जावेद पठाण,निसार शेख,शरद रेडेकर,अविशांत कुमकर,शरद गर्जे आदी उपस्थित होते.


