



✒️रोशन मदनकर(उप संपादक)
गडचिरोली(दि.26डिसेंबर):-आपल्या देशाला संताची परंपरा लाभलेली आहे. या महान परंपरेचे दर्शन ध्यानपाठातून आपल्याला घडते. राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांनी ध्यानपाठाच्या माध्यमातून जनसामान्यांना अध्यात्म ज्ञानाचे धडे दिले. व्यक्तिमत्व विकासाला बाधक ठरणारी मानसिक कमजोरी दूर करण्यासाठी त्यांनी मनाच्या स्थिरतेचा प्रभावी अभ्यास सुचविला आहे,असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी गडचिरोली येथे केले.
ते अ.भा.श्रीगुरुदेव सेवा मंडळ शाखा गोकुळ नगरच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी सप्ताहाची सुरुवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेचे आणि ग्रामगीता ग्रंथाचे पूजन करून करण्यात आले. सकाळच्या ध्यानपाठाच्या प्रसंगी सर्व गुरुदेव सेवकांची उपस्थिती लाभली होती.सामुदायिक ध्यान पाठावरील विचार प्रकटन ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी केले. याप्रसंगी श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिवनाथ कुंभारे ,रामनगर शाखेचे सेवाधिकारी सुरेश मांडवगडे ,मधुकरराव भोयर, दलितमित्र नानाजी वाढई, पंडित पुडके ,प्रवीण मुक्तावरम, आजीवन प्रचारक आत्माराम आंबोरकर प्रामुख्याने उपस्थित होते. ध्यान पाठानंतर गोकुळनगर भागांमध्ये रामधून काढण्यात आली. रामधून मध्ये शाखेचे सर्व सदस्य , वार्डातील उत्साही नागरिक ,बालक मंडळी प्रामुख्याने सहभागी झालेली होती.
सूत्रसंचालन ग्रामसेवाधिकारी सुखदेव वेठे यांनी केले. पुरुषोत्तम कुळमेथे अमित तिवाडे. मारोतीउईके, अनिल धात्रक, भास्कर नरुले किसन मडावी ,नत्थुजी चीमुरकर, पांडुरंग घोटेकर, सुनील उराडे, माणिक गेडाम, चंद्रभान जांभुळकर ,संजय बारापात्रे, जयभारत मसराम श्रीकांत कुत्तरमारे, विनायक कोडापे, धर्मदास नैताम आदी मान्यवरांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहयोग दिला . चंद्रभान जांभुळकर आणि डॉ. शिवनाथ कुंभारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावर्षी कोरोना नियमाचे पालन करून छोटेखानी स्वरूपात कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.





