Home महाराष्ट्र भारतीय विद्यार्थी मोर्चाचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष मा.किशोर खरात सकाळ यीन च्या निवडणूकीत...

भारतीय विद्यार्थी मोर्चाचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष मा.किशोर खरात सकाळ यीन च्या निवडणूकीत प्रचंड मतांनी विजयी..!

287

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड,माण)मो:-9075686100

म्हसवड(दि.26डिसेंबर):-भारतीय विद्यार्थी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष मा.किशोर खरात सकाळ न्यूज पेपर माध्यमातुन Young Inspiration Network (यीन) आयोजित निवडणुकीत 300 मतांनी विजयी झाले आणि दहिवडी काॅलेज दहिवडी चे अध्यक्ष पदी निवडुण आल्या नंतर त्यांनी बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना भारतीय विद्यार्थी मोर्चा या राष्ट्रव्यापी संघटन मध्ये सहभागी होऊन महापुरुषांचे अपूर्ण राहिलेलं काम करण्यासाठी पुढे यावे आणि बहुजन समाजाची गुलामी नष्ट काम करण्यासाठी कार्य करावे असे आवाहन किशोर खरात भारतीय विद्यार्थी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष यांनी बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना केले.

आणि त्यांना पुढील कार्यासाठी भारतीय विद्यार्थी मोर्चा जिल्हा युनिट च्या वतीने हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.मा.प्रथमेश ठोंबरे राज्य प्रवक्ता भारतीय विद्यार्थी महाराष्ट्र राज्य,मा.चेतन आवडे जिल्हा अध्यक्ष,मा.कुणाल देवकुळे तालुका अध्यक्ष,मा.रोहित नितनवरे शहर अध्यक्ष, मंगेश लोखंडे, इरफान महात,शुभम भंडारे, संकेत यादव,इ कार्यकर्त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा देण्यात आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here