



✒️पुणे(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
पुणे(दि.26डिसेंबर): – अनुपमा कुलकर्णी ,सारंग कुलकर्णी, पराग मुळे यांची संकल्पना व निर्मिती असलेला के टू पी बिट्स प्रस्तुत राजेश खन्ना यांच्यावर चित्रीत केलेल्या हजार राहे या सदाबहार हिंदी गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन 26 डिसेंबर 2021 रोजी पुण्यातील श्रमिक पत्रकार संघाच्या पत्रकार भवन येथील सभागृहात सायंकाळी 5 ते 8 या वेळेत संपन्न होणार आहे.या के टू बिट्स प्रस्तुत ‘हजार राहे’ कार्यक्रमासाठी दैनिक नवभारत व दैनिक नवराष्ट्र हे माध्यम प्रायोजक म्हणून कार्यक्रमासाठी असणार आहेत.या कार्यक्रमाचे सह आयोजन श्रावी मीडिया व फिल्म प्रोडक्शन तर्फे करण्यात आले आहे.
के टू पी बीटस तर्फे यापूर्वी वृद्धाश्रमासाठी किशोर कुमार व मोहम्मद रफी यांच्या सदाबहार गीतांचे सामाजिक जाणिवेतून,’ नीले नीले अंबर ‘ व ‘गूंजी सी है ‘अशा प्रकारच्या संगीत कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात मेरे नैना सावन भादो, नदिया से दरिया, मै शायर,हमे और जीने की, रूप तेरा मस्ताना, अच्छा तो हम चलते है, हजार राहे, एक अजनबी हसीना से, गुन गुना रहे हैं भवरे, जय जय शिवशंकर आधी बहारदार गीतांचे सादरीकरण केले जाणार आहे. या हजार राहे या सदाबहार हिंदी गीतांच्या कार्यक्रमात अनुपमा कुलकर्णी सारंग कुलकर्णी , पराग मुळे ,प्रशांत निकम, मोना भोरे ,उदय कुंडलकर, अश्विनी कुलकर्णी, अतुल गर्दे, साधना शर्मा हे गायक आपली गीते सादर करणार आहेत. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन पुण्यातील प्रसिद्ध निवेदक आकाश सोळंकी करणार आहेत. या कार्यक्रमासाठी ध्वनी संयोजन व छायाचित्रण हेमंत उत्तेकर व शीतल हुंडेकर हे करणार आहेत.
तसेच या कार्यक्रमाचे स्थिर चित्रण नागेश झळकी करणार आहेत. या के टू बिट्स प्रस्तुत ‘हजार राहे’ कार्यक्रमासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया हे प्रायोजक असणार आहेत. या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य श्रावी मीडिया अँड फिल्म प्रोडक्शन तसेच ऑनलाइन माध्यम प्रायोजक न्यूज24लाईव्ह असणार आहेत . तरी या कार्यक्रमास सर्व संगीत प्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन के टू पी बीटसचे अनुपमा कुलकर्णी, सारंग कुलकर्णी ,पराग मुळे,श्रावी मीडिया अँड फिल्म प्रोडक्शनचे संचालक विवेककुमार तायडे,,श्रावी मीडिया अँड फिल्म प्रोडक्शनचे व्यवस्थापक प्रशांत निकम या आयोजकांनी केले आहे. कोरोना महामारी च्या पार्श्वभूमी मुळे फिजिकल डिस्टनसिंगचे सर्व शासकीय नियम पाळून हा कार्यक्रम मोजक्या लोकांच्या उपस्थितीत सर्वांसाठी विनामूल्य आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या शो साठी मोफत पासेससाठी संपर्क 9309708672/9372584452 या क्रमांकावर करावा , असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.


