Home महाराष्ट्र आ.डॉ.रत्नाकररावजी गुट्टे साहेब यांच्या वतीने शासकीय योजना-मोफत मदत केंद्र

आ.डॉ.रत्नाकररावजी गुट्टे साहेब यांच्या वतीने शासकीय योजना-मोफत मदत केंद्र

74

🔹उपविभागीय अधिकारी सुधीरजी पाटील साहेब यांच्या शुभहस्ते उद्घाटन संपन्न

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि:२५ डिसेंबर):-२०२१ रोजी गंगाखेड विधानसभेचे लोकप्रिय आ. डॉ.रत्नाकररावजी गुट्टे साहेब यांच्या संकल्पनेतून मतदार संघातील नागरिकांसाठ शासकीय योजना-मोफत मदत केंद्राची स्थापना केली.या मोफत मदत केंद्राच्या माध्यमातून गंगाखेड विधानसभेतिल गंगाखेड,पालम पूर्णा या तिन ही तालुक्यातील जनतेला शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यास व ऑनलाईन फॉर्म मोफत भरून देण्यास मदत होईल. मोफत मदत केंद्राच्या माध्यमातून १०० लाभार्थ्यांना ई- श्रम-कार्डचे मान्यवरांच्या हस्ते वाटप केले.

त्यामध्ये प्रधानमंत्री आवास,योजना इंदिरा आवास, योजना,रमाई आवास योजना, सामाजिक न्याय विभागातील महामंडळांच्या योजना, श्रावणबाळ,संजय गांधी,इंदिरा गांधी,अपंग व दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव व साधने पुरविणे योजना,स्व.गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना,विविध कृषी योजना, दुग्ध विकास योजना, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना,प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना, पंतप्रधान/मुख्यमंत्री रोजगार कार्यक्रम योजना,राशन कार्ड, विविध ट्रस्टच्या माध्यमातून आरोग्यासाठी साहित्य मिळवून देणे,समाज कल्याण/सामाजिक न्याय विभागांतर्गत येणाऱ्या योजना,जिल्हा उद्योग केंद्र, कामगार कल्याण योजना,श्रम कार्ड इत्यादी योजनांचा जनतेला लाभ मिळण्यास मदत होईल.

या मदत केंद्राचे उद्घाटन गंगाखेडचे उपविभागीय अधिकारी मा. सुधीरजी पाटील साहेब यांच्या सुभहस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा.गोविंदजी येरमे साहेब(तहसीलदार गंगाखेड), मा.श्री बनसोडे (तालुका कृषी अधिकारी गंगाखेड), प्रमुख उपस्थिती अंजनाताई कुंडगीर, (स. प्रकल्प अधिकारी न.प. गंगाखेड) सत्यभामाताई मुरकुटे,मा.पि.पि.राठोड (विस्तार अधिकारी पं.स.गंगाखेड) इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला यावेळी जि. प.स.किसनराव भोसले,राजेश फड,जि.अध्यक्ष संदीप आळनूरे, वि.अध्यक्ष कृष्णा सोळंके, गंगाखेड प्रभारी हनुमंत मुंडे, पालम/पूर्णा प्रभारी माधवराव गायकवाड,ता.अध्यक्ष शिवाजी पवार,पं.स. सभापती मुजाराम मुंडे, पं.स.स.मगर पोले,नितीन बडे,नगरसेवक राधाकिसन शिंदे, सत्यपाल साळवे,शहराध्यक्ष खालील भाई,इक्बाल चाऊस, महेशआप्पा शेटे, वैजनाथ टोले, सतीश घोबाळे,अशोकभाऊ घोबाळे, ब्रिजेश गोरे,विलास गाढवे संजय पारवे, एकनाथ गेजगे,संभाजीदादा पोले,रासप व आ. डॉ.रत्नाकररावजी गुट्टे काका मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते,सरपंच व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here