Home महाराष्ट्र बलात्कारितेच्या योनीत तिची इज्जत असते का? पँथर डॉ राजन माकणीकर

बलात्कारितेच्या योनीत तिची इज्जत असते का? पँथर डॉ राजन माकणीकर

285

✒️मुंबई(पुरोगामी न्युज नेटवर्क)

मुंबई दि(दि.25डिसेंबर):-बलात्कार होणाऱ्या पीडित महिलेच्या योनीत तिची इज्जत असते का? असा सवाल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) पक्षाचे राष्ट्रीय महासचिव पँथर डॉ. राजन माकणीकर यांनी व्यक्त केला आहे.

पँथर ऑफ सम्यक योद्धाचे संस्थापक महासचिव डॉ. माकणीकर पुढे असे म्हणाले की,कोणत्याही महिलेची इज्जत तिच्या योनीत नसून शीलात असते, शील आणि चारित्र्ये हीच तिची इज्जत आणि बहुमोल दागिना आहे, तिचा बलात्कार झाला म्हणून ती लज्जित होत नाही. “तो” लिंगपिसाट नराधम पुरुष लज्जित झाला पाहीजे, त्याला स्वतःला स्वतःची लाज वाटायला पाहिजे.महिलांनी अश्या प्रसंगा तुन स्वतःला सावरून ताट मानेने जीवन जगणे आवश्यक असून भारतीय समाजाने अश्या पीडित महिलेला जीवनात प्रोत्साहन देणे महत्वाचे ठरते.

पुरुषांनी महिलांकडे पाहण्याची दृष्टी बदलली पाहिजे, आयुष्याची जोडीदारीन सोडून प्रत्येक महिलेला माता बघिणी च्या नजरेने पाहिल्यास बलात्कार होनारच नाहीत. बहुतांश युवक आणि पुरुषांची नजर रस्स्त्यावर चालणाऱ्या महिलेच्या स्तनावर किंवा कमरेवर असते अश्यावेळी अश्या पुरुषांनी असपल्या माता भघिणीना नजरेसमोर आणावेत असाही सल्ला विद्रोही पत्रकार डॉ. माकणीकर यांनी वाईट नजरेने पाहणाऱ्या वृत्तीला दिला.

महिला ही जगत जणनी आहे, बुद्ध बसवेश्वर आंबेडकर शिवराय यांसारख्या महामानवाला जन्म देणारी महिला, माता, भगिनी मासिक पाळीतील त्या पाच दिवसासाठी अपवित्र कशी होते? हा प्रश्न सातत्याने निर्माण होत असून पुरुष प्रधान देशात इतकी संकुचित बुद्धीची व्यक्ती कशी काय याच मातेच्या उदरातून जन्माला येतात. शेवटी स्त्री चा आदर सन्मान हाच आपला पुरुषी धर्म असल्याचेही त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here