



✒️भास्कर फरकडे(चामोर्शी,तालूका प्रतीनिधी)मो:-9404071883
चामोर्शी(दि.25डिसेंबर):-तालुक्यातील सोमनपल्ली येथे इयत्ता पहिली व दुसरीतील विद्यार्थ्यांच्या मातांचा स्मार्ट माता मेळावा काल 24 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात होता.मेळाव्याचे उद्घाटन सरपंच निलकंठ पा. निखाडे यांच्याहस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष देवराव कुळसंगे होते. प्रमुख अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा सपना अंगलवार, सदस्य गुरूदेव कस्तुरे, शंकर पेदापल्लीवार, नानाजी अलोने, ज्योत्सना मेडपल्लीवार, संगीता पेदापल्लीवार, लक्ष्मी मेडपल्लीवार, पुष्पा जंपलवार, अरूणाताई पेदापल्लीवार, संदिप नेवारे उपस्थित होते.
मार्गदर्शक म्हणून कोनसरीचे केंद्रप्रमुख सी.एम. गोटीपर्तीवार, प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचे जिल्हाप्रमुख श्रीकांत मडामे, ग्रा.पं. सदस्य वासुदेव देठेकर, पोलीस पाटील मंगलाताई भेंडारे, ग्रामसेवक मकरंद बांबोळे, ग्रा.पं. सदस्या रूपालीताई निखाडे, सुनिताताई मेकर्तीवार, माजी उपसरपंच हरीचंद्र नेवारे, संगीताताई गोडबोले आदी उपस्थित होते.यावेळी स्मार्ट माता म्हणून शालु उमाजी सरवर, सपना शंकर पेदापल्लीवार, वैशाली पुरूषोत्तम मोहुर्ले यांची निवड करण्यात आली. यांना सरपंच निखाडे यांच्याहस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन मुख्याध्यापिका एम.पी. बांबोळे यांनी केले. आभार एस.जी. शेडमाके यांनी मानले.





