



✒️सिद्धार्थ वाठोरे(दि.हदगाव-नांदेड)मो:-9373868284
नांदेड(दि.25डिसेंबर);;ओबीसी आरक्षणामुळे नगर परिषद हादगाव येथील उमेदवारांच्या चेहर्यावर नैराश्य आले आहे व येणार्या २९ ला हदगाव नगर परिषदचा कार्यकाळ संपत असल्यामुळे लवकरात लवकर प्रशासक नेमण्यात यावा असे आवाहन देवानंद पाईकराव यांनी केले असून वंचित बहुजन आघाडी हदगाव तालुक्याच्या वतीने मुख्याधिकारी नगर परिषद हदगाव यांना तसे निवेदनही देण्यात आले आहे.या महिन्यात २९ तारखेला हदगाव नगर परिषद चा कार्यकाळ पूर्ण होनार आहे .
त्यामुळे वंचित बहुजन आघाडी तर्फे हे निवेदन देण्यात आले आहे.कार्यकाळ संपताच त्या ठिकाणी प्रशासक नेमण्यात यावा अश्या प्रकारचे निवेदन तालुकाध्यक्ष देवानंद पाईकराव यांनी प्रत्यक्ष मुख्यधिकरी उपस्थितीत असताना त्यांच्या कडे दिले आहे . वार्ड रचना प्रभाग रचना , नगराध्यक्ष पदाचे आरक्षण व वाढीव प्रभाग या कारणास्तव या महिन्यात मुदत संपणारी नगर परिषद निवडणूक वेळेत पूर्ण होईल असे वाटत नाही . त्यामुळे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले . यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते त्यामध्ये हदगाव तालुका अध्यक्ष देवानंद पाईकराव , बबन भालेराव , रमेश नरवाडे , कपिल वायवल , सिद्धार्थ नरवाडे, सुशील भालेराव , रणजित बगाटे उपस्थित होते


