Home महाराष्ट्र मैत्री आठवणी ग्रुप तर्फे स्नेहमिलन सोहळा सम्पन्न..

मैत्री आठवणी ग्रुप तर्फे स्नेहमिलन सोहळा सम्पन्न..

252

🔸२५ वर्षां नंतर सर्व मित्र एकत्र आले…

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.24डिसेंबर):- मैत्री आठवणी ग्रुप तर्फे ,ने. हि. उच्च माध्यमिक विद्यालय ब्रम्हपुरी १९९१-९३ वर्ग १२ वी बैच च्या विध्यार्थ्यांचा स्नेहमीलन सोहळा नगरसेवक नितीनजी उराडे आणी वर्गशिक्षक मा प्रा. राम दोनाडकर सर यांच्या उपस्थितीत ग्रीनलँड रोप वाटिका येथे दिनांक २१ डिसेंबर २०२१ रोजी पार पडला कार्यक्रमचे सत्कारर्मूर्ती प्रा. राम दोनाडकर सर अध्यक्षीय भाषणात माणसाने प्रामाणिक आणी नियमाने जगले तर जीवनात उच्चत्तम शिखर गाठण्यास त्यांना कुणीही अडवू शकत नाही,असे मत व्यक्त केले. तर ,नितीनजी उराडे यांनी देव देव खूप ऐकलं पण ,माणसातील खरा देवमाणूस सरांमध्ये आम्हला दिसला असे प्रतिपादान केले. शिल्पा घाटबंध्ये हिने शाल व श्रीफळ देऊन सरांनचा सन्मान केला नितीन तथा १९९३ ब्याचं च्या सर्व विदयार्थ्यांनी पुष्प् देऊन सरांचे स्वागत केले, आणी आशीर्वाद घेतले.

सूत्रसंचालन श्री संजय कुमरे व अजय कऱ्हाडे यांनी केले,संजयनी “मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा ” असतो असे भाव व्यक्त केले.रात्रीच्या थंडगार गारव्यात अनिल निनावे यांनी झिंग झिंग झिंगाट गाण्यावर डान्स करून वातावरण ऊबदार केलं . जवळ जवळ २५ वर्षां नंतर सर्व मित्र एकत्र आले, आणी जुन्याआठवणी ना उजाळा आला असे भाव शिल्पा घाटबांधे हिने व्यक्त केले. ममता राऊत, संजय बुर्ले, विलास शेंडे, अरविंद भटारकर , राजू शिवनकर, शैलेश बिलगय्या , संजय मांढरे, प्रेमा राऊत, माधुरी कडू, कल्पना आमले , सुचिता गाडगीळवार, सतीश तासकर, अनिता उराडे, स्वाती राऊत, या सर्वांनी कार्यक्रमाला यशस्वितेकडे नेण्यास मोलाचे सहकार्य केले.
आज लई आणी अरविंद यांचा जन्मदिवस असल्यामुळे दोनाडकार सरांनी पुष्पं गुच्छ देऊन दोघांनाहि आशीर्वाद दिले. सेन्हमिलन सोहळ्यायला यशस्वी करण्यात राहुल सातपुते आणी पन्ना कुक यांचे बहुमूल्य योगदान लाभले .

“दुःख अडवायला उंबऱ्यासारखा “मित्र” वनव्यामध्ये गारव्यासारखा !” ह्या कवितेनी कार्यक्रमाची सांगता केली. कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर श्री राम दोनाडकर सर ,हरणे सरबतथा सर्व मित्र आणी मैत्रिणी,बाबा साऊंड सिस्टिम, पन्ना कॅटर्स यांचे अजय कऱ्हाडे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here