



✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
चिमुर(दि.24डिसेंबर):-साने गुरुजी जयंती प्रसंगी कु अनिका घरत हिने प्रतिमेला अभिवादन केले . छकुली चौखे, पृष्पा केडझरकर , पल्लवी ननावरे,वैष्णवी मेश्राम, अनिका घरत, सागर बोरुले, करण उईके, निखिल दडमल, शोषम ठवरे ,मंथन आडे, रोहन घरत, समीर रामटेके आदी शालेय मंत्रीमंडळ सदस्यांनी साने गुरुजी यांच्या जिवन चरित्रावर प्रकाश ठाकला तर कु .पुजा रंदये हिने सुंदर गित सादर केले .
सानेगुरुजी जयंती प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री जिवतोडे यांनी जिवनचरीत्रातील मार्मिक गोष्टी विद्यार्थ्यानी स्वतःच्या जिवनात अवलंबून मानवधर्म पाळावा असे बिंबवले . श्री जांभुळे श्री बावणकरश्री रोकडे श्री दांडेकर आदी सरांनी मनोगत व्यक्त केले . याप्रसंगी कु . शिवानी गेडाम हिने सुंदर कार्यक्रमाचे संचालन तर अंकिता धारणे हिने आभार प्रदर्शन केले . “खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ” या प्रार्थनेने कार्यक्रमाचा समारोप झाला .


