Home महाराष्ट्र प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने PI श्री तायडे यांना निरोप...

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने PI श्री तायडे यांना निरोप तर PI श्री काइंगडे यांचे स्वागत

277

✒️रायगड(पुरोगामी न्युज नेटवर्क)

पाली,रायगड(दि.24डिसेंबर):- प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने सुधागड पालीचे पोलीस निरीक्षक श्री तायडे यांना निरोप देण्यात आला तर नवीन रुजू झालेले पोलीस निरीक्षक श्री विश्वजित काइंगडे यांचे स्वागत यांचे स्वागत करण्यात आले.दिनांक २३ डिसेंबर,२०२१ रोजी सुधागड पाली तालुक्याचे पोलीस निरीक्षक श्री तायडे यांचा निरोप समारंभ तथा नवनार्चित पोलीस निरीक्षक श्री विश्वजित काइंगडे यांच स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख दत्तात्रेय दळवी, सुधागड पालीचे तहसीलदार श्री रायन्नावर तसेच तालुक्यातील विविध क्षेत्रातील राजकीय नेते व पत्रकार उपस्थित होते याप्रसंगी पोलीस ठाणे पाली यांनी प्रेस संपादक पत्रकार संघाचे सुधागड तालुका अध्यक्ष राजू शेख यांना आमंत्रित करण्यात आलं होतं.

प्रेस संपादक व पत्रकार संघ महाराष्ट्र सुधागड तालुका अध्यक्ष म्हणून राजू शेख यांनी त्यांच्या आमंत्रणाला मान देऊन या समारंभ मध्ये उपस्थित राहून श्री तायडे यांना निरोप देऊन नवनार्चित पोलीस निरीक्षक श्री काइंगडे यांचं स्वागत करण्यात आले. यावेळी संघाचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख दत्तात्रेय दळवी यांनी मनोगत व्यक्त करून संघाच्या वतीने शुभेच्छा दिल्या.निरोप समारंभा प्रसंगी श्री तायडे यांना पुष्पगुच्छ देऊन निरोप दिला तर नवीनच रुजू झालेले पोलीस निरक्षक श्री काइंगडे यांचे प्रेस संपादक व पत्रकार संघाचे सुधागड तालुका अध्यक्ष राजू शेख व इतर पत्रकार बंधूनी सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Previous articleब्रम्हपुरी तालुका महिला काँग्रेस आघाडीच्या अध्यक्षा मंगलाताई लोनबले यांचा ग्रा.प़. पोटनिवडनुकीत पराजय…
Next articleआवश्यक तिथेच बोलले पाहिजे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here