Home महाराष्ट्र समर्पण प्रार्थना भवन गणेशनगर,जालनाच्या वतीने धार्मिक,सामाजिक,सांसकृतिक कार्यक्रमांचे आयोजन

समर्पण प्रार्थना भवन गणेशनगर,जालनाच्या वतीने धार्मिक,सामाजिक,सांसकृतिक कार्यक्रमांचे आयोजन

399

✒️अतुल उनवणे(जालना,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9881292081

जालना(दि.24डिसेंबर):-ख्रिश्वन धर्मियांचा अत्यंत महत्वाचा असणारा सण म्हणजेच नाताळ सण,या सणानिम्मित समर्पण प्रार्थना भवन गणेशनगर जालनाच्या वतीने व प्रार्थना भवनच्या सर्व सभासदांच्या सर्वांनुमतें व मुख्य मार्गदर्शक रेव्हरंट सूरज रोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ख्रिसमस फेस्टिव्हल 2021-2022 ची नाताळ कार्यकारिणीची निवड करण्यात आली, समर्पण प्रार्थना भवन च्या सर्व सभासदाच्या मदतीने व नाताळ कार्यकारणीच्या वतीने विविध सामाजिक,धार्मिक,सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन कऱण्यात आले आहे.

यामध्ये प्रामुख्याने दिनांक 17 डिसेंबर 2021ते दिनांक 24 डिसेंबर 2021 पर्येंत कॅरल पार्टीचे चे आयोजन करण्यात आले आहे,या कॅरल पार्टी मध्ये सायंकाळी ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांच्या घरोघरी जाऊन ख्रिस्तजन्मोउत्सव निमित्त,प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेला शांतीचा संदेश, प्रेम,प्रीती याची घोषणा करीत व स्तुतिगीते गात जल्लोष साजरा करण्यात येत आहे.तसेच या कॅरल पार्टी फेरी दरम्यान घरोघरी जाऊन सर्व परिवारासाठी प्रार्थना करण्यात येत आहे व ख्रिस्त जयंतीच्या शुभेच्छा देण्यात येत आहेत.

तसेच येणाऱ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन आनंदोत्सव साजरा केला जात आहे.तसेच समर्पण प्रार्थना भवन व कार्यकारिणी च्या वतीने झाडे लावा झाडे जगवा चा संदेश देऊन पर्यावरणविषयक जनजागृती करण्यात येऊन प्रत्येक परिवारासाठी झाडाचे एक रोप भेट देऊन जतन करण्यासाठी विनंती करण्यात येते आहे.तसेच दरवाजावर लावण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताचे पवित्र वचन चे स्टिकर देण्यात येऊन त्यासोबत बायबल च्या नवीन कराराची एक प्रत भेट देण्यात येत आहे.

विशेष म्हणजे कॅरल पार्टीमध्ये सहभाग घेणारी मुले अत्यंत कमी वयांची असून यातील सर्व लहान मुलांनी या कार्यासाठी आपल्या खाऊसाठी जमा केलेल्या पैशातून सदरील कार्यक्रम राबवत आहेत.जालना शहरात सर्वत्र या लहान चिमुकल्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.आजपर्येंत जालना शहरातील गणेश नगर, हरी गोविंदसिहं नगर, लक्ष्मी नगर, गोकुळवाडी,मंठा चौफुली,यशवंत नगर, इंदेवाडी, सोरटी नगर, खादगाव, हिंगनगर, ढोरपुरा, गांधीनगर,भीम नगर,ख्रिस्ती कॅम्प,रामनगर,सटवाई तांडा(म्हाडा कॉलनी) इत्यादी ठिकाणी जाऊन कॅरल पार्टीफेरी काढण्यात आली आहे.

तसेच समर्पण प्रार्थना भवन च्या वतीने दिनांक 25 डिसेंबर 2021 ते 1 जानेवारी 2022 दरम्यान अनेक कार्यक्रमांचे आयोजन कऱण्यात आले आहे.

यामध्ये दिनांक 25 डिसेंबर 2021 रोजी ख्रिस्त जयंती निम्मित प्रार्थना भवन च्या मुख्य वतीने भक्ती चे आयोजन करण्यात आले आहे.

दिनांक 26 डिसेंबर 2021 रोजी सामाजिक कार्य करण्यात येणार आहे
.
दिनांक 27 डिसेंबर 2021 रोजी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले आहे.

दिनांक 28 डिसेंबर 2021 रोजी
बायबल वर आधारित प्रश्नोउत्तरे व वकृत्वस्पर्धा चे आयोजन केलं आहे.

दिनांक 29 डिसेंबर 2021 रोजी
क्रिकेट सामने चे आयोजन करण्यात आले आहे.

दिनांक 30 डिसेंबर 2021 रोजी घर सजावट प्रतियोगितेचं आयोजन करण्यात आलं आहे.

दिनांक 31 डिसेंबर 2021रोजी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

दिनांक 1 जानेवारी 2022 रोजी प्रार्थना भवन च्या वतीने भक्तीचे आयोजन करण्यात आले आहे तसेच सर्वांसाठी प्रीती भोज ठेवण्यात आले आहे.वरील सर्व कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन पुरोगामी संदेश न्यूज नेटवर्कच्या प्रतिनिधीशी बोलतांना संयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.वरील सर्व कार्यक्रमांसाठी मुख्य मार्गदर्शक म्हणून समर्पण प्रार्थना भवन चे रेव्हरंट सूरज रोडे (युवा उद्योजक) यांचे अत्यंत मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.तसेच सदानंद आठवले, शिवाजी सुतार, रमेश घोरपडे, संदीप आठवले, उमेश घोरपडे, पास्टर अक्षय निर्मळ,आदेश सुतार यांच्या सह प्रार्थना भवन च्या सर्व सभासदांचे सहकार्य लाभले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here