




🔸नागरिकांच्या ग्रामपंचायतीला हेलपाट्या
✒️नेरी प्रतिनिधी(नितीन पाटील)
नेरी(दि.23डिसेंबर):- वरून जवळच असलेल्या खुटाळा(मो) येथे चिमूर तालुक्यातील नेरी येथून जवळच असलेल्या खुंटाळा येथील ग्रामसेवक हे कार्यालयात राहत नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.या दिरंगाई बाबत अनेकदा विचारणा केली असता माझे कडे इतर ग्रामपंचायत चा चार्ज असल्याचे ग्रामसेवका कडून सांगण्यात येते त्यामुळे कामाच्या प्रसंगी नागरिकांनी जावे तरी कुठे असा प्रश्न नागरिकांत भेडसावत आहे.
दररोज अनेक नागरिक आपली लहान मोठी कामे घेऊन ग्रामपंचायत येथे येत असतात मात्र ग्रामसेवक कार्यालयीन वेळात ग्रामपंचायत मध्ये हजर राहत नसल्याने त्यामा आल्यापाऊली परत जावे लागते. त्यामुळे ग्रामसेवकाच्या प्रतीक्षेत नागरिकांना ग्रामपंचायतीच्या हेलपाट्या माराव्या लागत आहेत.तेव्हा प्रशासनाने या गंभीर बाबीची दखल ग्राम सेवकाला कार्यलयीन वेळात ग्रामपंचायत मध्ये उपस्थित ठेवावे अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य अरमान बारसागडे व नागरिकांनी केलेली आहे.




