Home महाराष्ट्र हेरिटेज डेअरी उपाध्यक्ष श्रीसत्यनारायण यांच्याकडून डॉ. कदम यांच्या तब्बेतीची विचारपूस; तातडीची केली...

हेरिटेज डेअरी उपाध्यक्ष श्रीसत्यनारायण यांच्याकडून डॉ. कदम यांच्या तब्बेतीची विचारपूस; तातडीची केली आर्थिक मदत

254

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड) मोबा.9075686100

म्हसवड(दि.23डिसेंबर):-श्री.सत्यनारायण, उपाध्यक्ष, हेरिटेज डेअरी यांनी फलटण येथे डॉ.कदम यांची त्यांच्या राहत्या घरी भेट घेतली.डॉ.कदम हे हेरिटेज फुडसमध्ये सल्लागार म्हणून सेवेत होते. दुर्दैवाने त्यांचा अपघात झाला त्यामुळे त्यांना अपंगत्व आले.त्यांचेवर उपचार करणे साठी हेरिटेज कर्मचाऱ्यांनी तातडीने मदत केली. कंपनीने तातडीने 3 लाख रुपये व नंतर 5 लाख रुपये अशा प्रकारे आरोग्य विमायोजनेअंतर्गत एकूण 8 लाख रुपयाची मदत केली.
आता त्याची प्रकृती सुधारत आहे.

दोन वर्षानंतर हेरिटेज डेअरी चे श्री.सत्यनारायण Vice President सांगवी येथे आले असताना खास डॉ.कदम यांना भेटून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. कंपनी मधील कर्मचाऱ्यांनी काळजी घेण्याचे कंपनीचे धोरण असून माणुसकीच्या दृष्टिकोनातून नेहमी मदत करणे ही हेरिटेज डेअरी ची संस्कृती मानली जाते.श्री सत्यनारायण याचे सोबत श्री.स्वामी सर, डॉ. डी.बी.जगदाळे विभागीयप्रमुख- महाराष्ट्र,श्री कामेरीकर हे सुद्धा उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here