




🔹निस्तार डेपो उपलब्ध करून देण्याची नागरिकांची मागणी
✒️भास्कर फरकडे(चामोर्शी,तालूका प्रतीनिधी)मो:-9404071883
चामोर्शी(दि.22.डिसेंबर) चामोर्शी तालुक्यातील आष्टी परीसरात अनेक गावामध्ये निस्तार डेपो नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे मात्र गावातील लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष होत असल्याने गावात निस्तार डेपो देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.चामोर्शी तालुक्यातील आष्टी परीसरात मोठया प्रमाणात जंगल आहे पण चपराळा वन्यजीव अभयारण्य असल्याने या अभयारण्यच्या जंगलात जाण्यास बंदी आहे व एकतर आष्टी परीसरात वाघाची भिती असल्याने प्रादेशिक वन विभागाच्या राखीव जंगलात सरपण आणण्यासाठी जाण्यास वाघाची भिती निर्माण झाली आहे.
वन विभागाकडून व शासनाकडून गॅस मिळाले पण गॅसचे दर वाढल्याने कष्टकरी मजूराना कोणत्याही प्रकारचा रोजगार नसल्याने गॅस घेण्यासारखे नाहीत या गॅस दरवाढीला कंटाळून काही जनाचे गॅस बंद पडले आहेत. मारकंडा कंनसोबा येथे एक वन विकासाचे डेपो आहे व एक प्रादेशिक वन विभागाचे कार्यालय आहे मात्र आष्टी परीसरात निस्तार डेपो नाही करीता आष्टी परीसरातील लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन आष्टी परीसरातील गावात निस्तार डेपो उपलब्ध करून द्यावे अशी मागणी आष्टी परीसरातील नागरिकांकडून होत आहे




