Home क्राईम खबर  गंगावाडी ग्रामपंचायतच्या वतीने अवैध वाळु ऊपस्या संदर्भात जिल्हाधिका-यांना निवेदन

गंगावाडी ग्रामपंचायतच्या वतीने अवैध वाळु ऊपस्या संदर्भात जिल्हाधिका-यांना निवेदन

283

✒️तलवाडा प्रतिनिधि(शेख आतिख)

गेवराई(दि.22डिसेंबर):- तालुक्यातील तलवाडा पोलीस ठाणे हद्दितील गोदाकाठच्या पट्टयातुन दिवस रात्र होत आसलेला अवैध वाळु ऊपसा व वाहतुक थांबता थाबत नसल्याने गंगावाडी ग्रामपंचायतच्या वतीने जिल्हाधिका-यांना एक निवेदन देण्यात आले असुन या निवेदनात म्हण्टले आहे की गंगावाडी ग्रामपंचायत हद्दितील गोदावरी पात्रातील वाळु अवैध प्रकारे ऊपसा चालु आहे.

वारंवार सांगुन देखील बंद करत नाहीत या अवैध वाळु ऊपस्या वाहतुकी मुळे शेतकऱ्यांच्या जमीनीतुन वाहतुकीसाठी काढलेल्या रस्त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेत जमीनीचे नुकसान होत आहे. तरी मा. जिल्हाधिकारी बीड यांनी या भागातील होणारा अवैध वाळु ऊपसा व वाहतुक थांबऊन शेतकऱ्यांच्या जमीनीची होणारी नासधुस थांबवावी व संबधितावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी जर कार्यवाही झाली नाहीतर समस्त गावक-या मार्फत उपोषण करण्यात येईल आसे जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनात गंगावाडी ग्रामपंचायतच्या वतीने सांगन्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here