



✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.22डिसेंबर):-मनुष्य आपल्या जीवनात वेगवेगळे छंद जोपासत इतर व्यक्ती पेक्षा वेगळे काहीतरी करून सामाजिक संदेश देण्याचे काम करत असते.असेच नाशिक येथील वयोवृद्ध अवलिया यांनी आपल्या मित्रांना सोबत घेऊन चक्क सायकलवर गोदावरी नदीच्या उगमस्थानापासून ते समुद्राला मिळेपर्यंत चा भाग सायकल वर स्वार होऊन साडेतीन हजार किलोमीटर वारि करीत गोदावरी स्वच्छ व निसर्गाचा समतोल कसा राखावा हा संदेश दिला आहे.
नाशिक सायकलिस्टस फाऊंडेशनचे सहा ज्येष्ठ नागरीक दि. २५ नोव्हेंबर पासून ३५०० किमी ची गोदावरी सायकल परीक्रमेसाठी निघाले आहेत. त्यांनी गोदावरीच्या ब्रम्हगीरी येथील ऊगमापासून ते बंगालच्या उपसागरात यानम येथे ही नदी समुद्राला मिळते तोपर्यंत सायकलने जाऊन पुन्हा नाशिक येथे परतण्याचा संकल्प केला आहे. हे सर्व सायकलिस्टस ६० ते ७० वयोगटातले आहेत.
चंद्रकांत नाईक वय 70 वर्ष,श्रीराम पवार वय 67 वर्ष,
रमेश धोत्रे वय 64 वर्ष,शिवनारायण मिश्र वय 62 वर्ष,
रामनाथ सौंदाणे वय 60 वर्षउल्हास कुलकर्णी वय 60 वर्ष
हेमंत खेलुकर वय 33 वर्षे हे सामाजिक संदेश घेऊन निघाले आहेत.नदीला आपण माता मानतो तर तिचे पावित्र्य राखले पाहिजे. तिला निर्मळ, स्वच्छ आणि खळखळती ठेवली पाहिजे.सायकल चालवा पर्यावरण वाचवा. सायकल चालवा निरोगी राहा.NetZeroIndia या मोहिमेंतर्गत आठवड्यातून कमीत कमी एक वेळातरी कामावर सायकल वापरा जेणेकरुन कार्बनचै उत्सर्जन थांबेल.
झाडे लावा झाड़े जगवा. यामुळे हवेतील कार्बन शोषून घेण्यास मदत होईल.हे सायकलीस्टस मंगळवार रोजी गंगाखेड येथे 2700 किमी चा प्रवास करून पोहोचलेत. ते महाराष्ट्र, छत्तीसगढ़, तेलंगणा, आंध्रप्रदेश व पांडिचेरी अशा प्रदेशातून प्रवास करीत 27 दिवसानंतर येथे पोहोचलेत. नाशिक येथे ते 25 डिसेंबरपर्यंत पोहोचतिल यांचा सत्कार बालाजी मंदिर याठीकाणी गणेश भैरट ,रामचंद्र खारकर, गोपाळदेव खारकर ,नंदू महाराज खारकर, वैष्णव भैरट, चंद्रकांत नरवाडे ,पंडित विधाते, पृथ्वीराज चौधरी, हैबती राजे ,भारत साखरे, नागेश डमरे, चंद्रशेकर साळवे, सिद्धार्थ भालेराव , मनोज राजेंद्र विशंभर साळवे, प्रतीक क्षीरसागर, विश्वाबर चोतवे, आकाश जगदाळे, अविनाश दावलबाजे यांनी गंगाखेड शहरात या सायकलस्वाराचे स्वागत केले.


